Monday, May 24, 2010

जाती आधारित जनगणनेचा विषय मंत्रीगटाकडे

नवी दिल्ली - जातीवर आधारित जनगणनेचा विषय मंत्रीगटाकडे सोपविण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक येथे झाली. त्यामध्ये जातीवर आधारित जनगणनेचा विषय चर्चेला आला. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.




जातीवर आधारित जनगणनेच्या विषयावरून सध्या देशात राजकीय क्षेत्रात वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी जातीवर आधारित जनगणनेचा विषय संसदेत लावून धरला होता. भारतीय जनता पक्षानेही जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीवर आधारित जनगणनेस विरोध दर्शविला. या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी भाजपने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ याबाबत काय निर्णय घेते, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.
 
Ref : eSakal

No comments:

Post a Comment