Tuesday, August 17, 2010

आमीर लाईव्ह...

"पीपली लाईव्ह' हा आमीर खानची निर्मिती असलेला चौथा चित्रपट. मनोरंजनाबरोबरच काहीतरी "सोशल मेसेज' देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमीरच्या या चित्रपटातही त्या पद्धतीचा वेगळेपणा आहे. पत्रकारिता करणाऱ्या अनुषा रिझवीचा हा पहिलाच चित्रपट. त्यानिमित्तानं आमीरशी साधलेला हा संवाद.



"पीपली लाईव्ह'चा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी काही संबंध आहे का?

- अजिबात नाही. गेल्या वर्षभरापासून मी या चित्रपटाचा शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी कसलाही संबंध नसल्याचं सांगत आलोय; परंतु त्यावर आपल्याकडचा "मीडिया' थोडाही विश्‍वास ठेवायला तयार नव्हता; परंतु या चित्रपटाच्या "प्रोमोज'चे प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर या चित्रपटाच्या कथानकाबाबतचे गैरसमज दूर झाले आहेत. हा चित्रपट म्हणजे आपल्या समाजावरचं प्रहसन आहे. ग्रामीण भारत आणि शहरी भारतामधील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. या चित्रपटात त्यावर खुसखुशीत भाष्य करण्यात आलंय.



"जाने भी दो यारो' तसेच श्‍याम बेनेगलांच्या "वेलकम टू सज्जनपूर' आणि "वेल डन अब्बा'सारखा या चित्रपटाचा फॉर्म आहे का?

- श्‍यामबाबूंचे हे दोन्ही चित्रपट मी अजूनपर्यंत पाहिलेले नाहीत. त्यामुळे त्याबद्दल मला भाष्य करता येणार नाही. मात्र "जाने भी दो यारो'शी या चित्रपटाचा संबंध आहे, हे मी सांगू शकतो. "जाने भी..'मध्ये भ्रष्टाचारावर प्रहसन करण्यात आलं होतं; मात्र हा चित्रपट फार्सिकल अंगानं जाणारा होता. आमचा चित्रपट फार्सिकल नसून वास्तव विनोदावर तो आधारला आहे.



अनुषाचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपट माध्यमाशी ती निगडित नसतानाही तू तिला थेट हा चित्रपट दिग्दर्शनासाठी कसा काय दिलास? अशा लहान "बजेट'च्या चित्रपटाची निर्मिती कराविशी तुला का वाटली?

- माझ्या दृष्टीनं कथानक हा चित्रपटाचा प्राण असतो. कथानक जर मला आवडलं तर मग इतर गोष्टी माझ्यासाठी सोप्या होतात. त्या वेळी मला मग माझ्या चित्रपटाचा कॅनव्हास लहान आहे की मोठा? असा प्रश्‍न पडत नाही. कथानक आवडलं तर मी थेट त्यात काम तरी करतो किंवा त्याची निर्मिती तरी करतो. "लगान'ची मी निर्मिती केली तेव्हा त्याची "कमर्शियल व्हॅल्यू' मी तपासली नव्हती. नेमकी तीच गोष्ट माझी निर्मिती असलेल्या "तारे जमीं पर'लाही लागू आहे. "रंग दे बसंती' जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा भगतसिंहांवर तब्बल चार चित्रपटांची निर्मिती झाली होती. त्यामुळे या चित्रपटाचा "कमर्शियल अँगल' कुठेही उद्‌भवतच नव्हता. तरीदेखील या चित्रपटाचं कथानक आवडल्यानं मी तो केला आणि त्याचा पुढचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. मी माझ्या "इन्स्टिंक्‍ट'वर निर्णय घेतो. आता अनुषाच्या नवखेपणाबद्दलच म्हणत असशील, तर तो माझ्यासाठी फारसा मोठा "इश्‍यू' नव्हता. कारण यापूर्वीही मी अनेक नवोदितांबरोबर काम केलं असून त्यांच्यासोबतचा माझा अनुभव खूप चांगला आहे. अनुषानं ऐकवलेलं कथानक मला खूप आवडलं. यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यासाठीही नवीन होत्या. "बीडीओ' हा काय प्रकार असतो हे मला माहीत नव्हतं. पटकथा वाचल्यानंतर मला "बीडीओ' म्हणजे "ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर' असतो हे समजलं. त्यानंतर तिनं मला काही "टेस्ट शॉट्‌स' दाखवले. तेसुद्धा चांगले उतरले होते. ते पाहिल्यानंतर माझा तिच्याबद्दलचा विश्‍वास वाढला. आता चित्रपट पाहिल्यानंतर मी दाखविलेला विश्‍वास तिनं खरा केला, याचा मला आनंद आहे.



"पीपली लाईव्ह'मध्ये अभिनेता रघुवीर यादवचा अपवाद वगळता इतर सर्व कलाकार नवीन आहेत. असं करणं तुला "रिस्की' वाटलं नाही का?

- कथानकाची जी गरज आहे, ती पुरी करणारे चेहरे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. या चित्रपटातील कलावंतांची निवड अनुषा आणि या चित्रपटाचा सहदिग्दर्शक मेहमूदनं केली आहे. या दोघांनीही शक्‍यतो खरे चेहरे निवडले आहेत. यातल्या बहुतेक सगळ्या चेहऱ्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. हबीब तन्वीर यांचा एक "थिएटर ग्रुप' आहे. त्यातील काही कलावंतांची निवड करण्यात आलीय. या सर्व चेहऱ्यांना रंगभूमीचा अनुभव असला तरी चित्रपट माध्यमासाठी त्यांनी पहिल्यांदाच काम केलंय. मी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यातील सर्व कलावंतांचा अभिनय पाहून मी थक्क झालो. कारण, या क्षेत्रात येऊन मला वीसहून अधिक वर्षं झालीत. मात्र अजूनदेखील मला असा "परफॉर्मन्स' देता आलेला नाही.



चित्रपटसृष्टीतील कलावंतांची तू चांगलीच थट्टा करतोस. मात्र या चित्रपटात तुझीच थट्टा करण्यात आलीय. याबद्दल काय सांगशील?

- खरंय हे. या चित्रपटातला विनोद वेगळ्या पद्धतीचा आहे. अनुषानं अनेक गोष्टींची खिल्ली उडवलीय. तिला माझीही खिल्ली उडवायची होती. या चित्रपटात "मीडिया'ला खूप महत्त्वाचं स्थान आहे. हा "मीडिया' आमच्या चित्रपटाचं "रिपोर्टिंग' करतोय, ही कल्पना होती. या "रिपोर्टिंग'मधून चित्रपटातल्या प्रमुख पात्रांची ओळख आम्ही दाखवलीय आणि त्याचे तसे "प्रोमोज'ही विविध वाहिन्या तसेच चित्रपटगृहांमधून सुरू आहेत. या चित्रपटाचं भोपाळजवळ शूटिंग सुरू होतं तेव्हा खरोखरीच एक जत्रा भरली होती. बरीच गर्दी असल्यानं तिथं वेगवेगळ्या वस्तू विकणारे विक्रेतेही आले. त्यातच माझ्या "गजनी' चित्रपटाचा फोटो असलेले वेफर्सही विकायला आले होते. हे वेफर्स काही आमच्या "प्रॉडक्‍शन'कडून उपलब्ध झालेले नव्हते. या वेफर्सवर एका वाहिनीचा प्रतिनिधी भाष्य करतो. "ये पागल हो गया है । भय्या बार बार "लगान' नहीं बनती' असा एक संवाद आहे. अशा पद्धतीनं अनुषानं माझी खिल्ली उडवलीय. तिला हा प्रसंग चित्रपटात हवा होता. मात्र त्यासाठी योग्य जागा न मिळाल्यामुळे आम्ही तो फक्त "प्रोमोज'मध्येच ठेवलाय.



तुझी निर्मिती असलेल्या चित्रपटांना विदेशातूनही मोठी मागणी असते. त्यामुळे "पीपली लाईव्ह'च्या विदेशातील प्रदर्शनासाठी काही खास तयारी केली आहेस का?

- "पीपली लाईव्ह'चे विदेशी हक्क विकताना आम्ही खूप काळजी घेतली. तिथल्या वितरणाचा अभ्यास करताना मला आढळलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडचं वितरण तंत्र हे अधिक चांगलं आहे. म्हणूनच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह मध्य पूर्व देशांमध्ये हा चित्रपट आम्ही स्वतःच वितरित करतो आहे. अमेरिकेत सर्वसाधारणपणे चांगला हिंदी चित्रपट 10 लाख डॉलर्सचा व्यवसाय करतो. आमच्या "थ्री इडियट्‌स'नं 70 लाख डॉलर्सचा व्यवसाय केला होता.



नवीन चित्रपट कधी स्वीकारणार आहेस?

- सध्या तरी फक्त "पीपली लाईव्ह'. त्याच्यातून बाहेर पडलो की मग "धोबी घाट' आणि नंतर "देल्ली बेली'. या तीन चित्रपटांचं प्रदर्शन मार्गी लागलं की मग मी अभिनय करायला मोकळा होणार आहे.



1 जुलैला तू ट्‌विटरवर आला आहेस. चाहत्यांचा तुला कसा रिस्पॉन्स मिळत आहे.

- मी ट्‌विटरवर आलो नाही, मला जबरदस्तीनं आणलं गेलं. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी थोडा मागं आहे. मात्र बच्चनसाहेबांनी मला ट्‌विटरवर येण्याचा आग्रह केला आणि माझ्याकडून 1 जुलै ही तारीखही वदवून घेतली. अर्थात, चाहत्यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे.

अमिताभ बच्चन हेच माझे गुरू - रजनिकांत

मुंबई - खरं तर दाक्षिणात्य चित्रपटरसिकांच्या मनातला तो देव, पण चित्रपट क्षेत्रात तो बिग बी अमिताभ बच्चन यांना आपला गुरू मानतो. नव्हे, तर अमिताभ त्याचे प्रेरणास्थान.




दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीवर राज्य करणारा रजनिकांत अमिताभ यांच्याविषयी भरभरून बोलतो, तेव्हा तो माणूस म्हणूनही किती मोठा आहे, याचा प्रत्यय येतो. रजनिकांतच्या बिगबजेट रोबो या चित्रपटाचे संगीत रविवारी रात्री लॉंच झाले. त्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील या दोन्ही दिग्गजांना रंगमंचावर एकत्र पाहण्याची संधी रसिकांना मिळाली. रजनिकांतने तब्बल तीन वर्षांनंतर मुंबईत पाऊल ठेवले.



नव्वदच्या दशकांत झळकलेल्या हम या चित्रपटात अमिताभ आणि रजनिकांतची जोडी रसिकांनी एंजॉय केली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो आपल्या शिवाजी द बॉस या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी मुंबईत आला होता.



रोबो संगीत लॉंचच्या निमित्ताने अमिताभ यांना भेटून आनंदीत झालेला रजनिकांत त्यांच्याविषयी भरभरून बोलला. तो म्हणाला, अमिताभ हे माझे प्रेरणास्थान आहेत. तसेच, ते माझे रोल मॉडेल आणि गुरूही आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मी नेहमीच आदर करतो. अंधा कानून, गिरप्तार आणि हम या चित्रपटांमधून आम्ही दोघांनी एकत्रित काम केले. त्यावेळी त्यांनी मला जे प्रेम दिले. माझी जी काळजी घेतली, ती मी कधीही विसरणार नाही.



रजनिकांत यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमिताभ यांनी रजनिकांत इथल्या मातीचे सच्चे सुपूत्र असल्याची भावना व्यक्त केली. मी रजनिकांतबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे एक मित्र म्हणून आणि एक सहकारी म्हणून मला त्याचे महत्त्व वाटते. तो या मातीचा सच्चा सुपूत्र आहे, ज्यावर सर्व भारतवासी प्रेम करतात.



त्याची नम्रता आणि माणुसकीबद्दल मला कौतुक वाटते. त्याला मिळालेले प्रसिद्धी, मोठेपणाचा त्याने जमिनीवर राहूनच आनंद लुटला. त्याच्यातील नम्रता प्रत्येक भारतीयाने उदाहरण म्हणून डोळ्यासमोर ठेवण्याजोगी आहे. त्याच्या साधेपणाचा, प्रामाणिकपणाचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे, असेही अमिताभ म्हणाले.



हॉलिवूडच्या धर्तीवर रोबो हा चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेला चित्रपट आहे. जेव्हा एखादा रोबेट माणसाच्या शरीरात शिरकाव करतो, तेव्हा काय काय होते, याचे चित्रण या चित्रपटात केले आहे.

नोकरी कशी शोधायची?

सोशल मीडियाचा वापर नोकरीच्या संधी शोधण्यासाठी आणि नोकरी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अगदी जाता जाता बनवलेले "फेसबुक'वरचे तुमचे प्रोफाईलही कदाचित तुमची नोकरीची संधी ठरवू शकते. त्यामुळे नोकरीचा शोध घेताना अशा साइटस्‌वरील आपली प्रोफाईल्सही "अप टू डेट' ठेवली पाहिजेत. कोणत्या सोशल नेटवर्कचा कसा वापर करायचा नोकरीसाठी...?




"कॉलेज संपले, आता

नोकरी शोधली पाहिजे...''

"मला माझ्या नोकरीत

आता बदल हवाय...''

"मी या नोकरीला वैतागलोय.

नोकरी बदलायची आहे...''



नोकरी शोधण्याची एक नाही तर अशी अनेक कारणे. नोकरी आणि तीही योग्य नोकरी शोधणे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. जागा 5 आणि अर्ज 500 ही सध्याची परिस्थिती. "एम्प्लॉयमेंट मार्केट' दिवसागणिक आणखीच अवघड होत जाणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला तुमच्या अंगातील सर्व कला या सर्वांच्या आधी जॉब शोधण्यासाठी वापराव्या लागणार आहेत. नवीन जागा भरायची आहे तर त्या जागेसाठीचा सर्वांत पहिला अर्ज माझा असला पाहिजे आणि आपण कसे या पदासाठी योग्य आहोत, हे संस्थेला सर्वांच्या आधी पटवून देता आले पाहिजे. ही गरज सुरू होतेय आणि इथेच सोशल मीडिया आपल्या मदतीला धावून येतो आहे.



या आहेत काही सोशल मीडिया टिप्स, ज्या तुम्हाला तुमचा नवीन आणि "ड्रीम' जॉब देऊ शकतात :



'लिंक्‍डइन' : "लिंक्‍डईन' ही वेबसाईटच मुळी आहे प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी. "लिंक्‍डइन'मध्ये आपण आपला प्रोफाईल बनवून त्यामध्ये आपल्या व्यवसायासंबंधीची माहिती देऊ शकता. नीट बनवला तर हा प्रोफाईल तुमचा ऑनलाईन बायोडेटाच बनून जातो. पण बरेच जण "लिंक्‍डइन'चा वापर पूर्णपणे करीत नाहीत. "लिंक्‍डइन'मध्ये आपला प्रोफाईल 100 टक्के पूर्ण आहे याची खात्री करा आणि किमान एक तरी "रेक्‍मेंडेशन' आपल्या नावे असू द्या. आपल्या सध्याच्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी "लिंक्‍डइन'वर कनेक्‍टेड राहा.



"लिंक्‍डइन'मध्ये "जॉब' असा एक विभाग आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या स्किलसेट्‌सना योग्य होईल, अशी नोकरी शोधू शकता. जरी योग्य नोकरी नाही मिळाली तरी योग्य माणसे जरूर मिळतील, जी तुम्हाला नोकरी शोधण्यात मदत करू शकतील. अशी माणसे ओळखा आणि त्यांच्याशी जरूर कनेक्‍ट व्हा. उदा. एखाद्या संस्थेचा रिक्रूटमेंट हेड अथवा ह्युमन रिसोर्स विभागामधील मंडळी.



ट्‌विटर : ट्‌विटरचा उपयोग फक्त काही तरी वाद घालायला किंवा मी सध्या काय करतोय हे सांगण्यापुरता नाही, तर ट्‌विटर वापरून तुम्ही तुमची नवीन नोकरी शोधू शकता. ट्‌विटरवर अनेक लोकांना फॉलो करण्याआधी आपला स्वतःचा प्रोफाईल नीट अपडेट करा. एक योग्य फोटो (अवतार) निवडा आणि मगच लोकांना फॉलो करणे चालू करा. फक्त आपल्याबद्दलच नव्हे, तर आपल्या कार्यक्षेत्राबद्दलही ट्‌विट करत चला. ट्‌विटरमध्ये फक्त जॉब नाही, तर व्यक्तींना शोधा. आजकाल अनेक संस्था आणि रिक्रूटमेंट एजन्सीज ट्‌विटरवर आहेत. ते नवीन जॉब ट्‌विटरवर अपडेट करीत असतात. त्यामुळे हा जॉब ट्‌विट केल्या क्षणीच आपल्याला समजू शकतो. उदा. KPITCummins (@kpitcareers), ADP (@adpcareers).



फेसबुक : फेसबुकचा तसा थेट नोकरी मिळवण्यात वापर कमी आहे; पण फेसबुकमध्ये तुम्ही अनेक लोकांशी अगदी कमी वेळात संपर्क साधू शकता आणि संवाद साधू शकता. त्यामुळे "लिंक्‍डइन' आणि ट्‌विटरमार्फत ज्या व्यक्ती तुम्ही शोधल्या आहेत त्यांच्याशी परिचय वाढवण्यासाठी तुम्ही फेसबुकमध्ये त्यांचे मित्र बनू शकता आणि हो, आपला फेसबुक प्रोफाईल अतिशय व्यवस्थितपणे बनवा. तुमच्या आवडी-निवडी, छंद, आवडते खाद्यपदार्थ, पुस्तके, लेखक इत्यादी वैयक्तिक स्वरूपाची माहिती, ज्यामुळे व्यक्तिमत्त्व समजते. अनेक रिक्रूटर्स एखाद्याला नोकरीवर घेण्यापूर्वी त्याचा फेसबुक प्रोफाईल नक्की पाहतात. असे होऊ देऊ नका, की तुम्ही मुलाखतीमध्ये माझा वाचन हा छंद आहे असे सांगाल आणि फेसबुक प्रोफाईलमध्ये वाचन बिलकूल आवडत नाही, असं लिहिलंय. तुम्हाला त्वरित खोटारडा ठरवून बाद केले जाईल. त्यामुळे फेसबुक प्रोफाईलकडेही व्यवस्थित लक्ष असू द्या.



यू ट्यूब : सचिन तेंडुलकरची वन-डेमधील डबल सेंच्युरी पुन्हा पाहायची आहे? पाहिजे तेव्हा पाहता येईल. यू ट्यूबवर अनेक चाहत्यांनी तो व्हिडिओ अपलोड केला आहे ना. पाहिजे तेव्हा सचिनची सेंच्युरी पाहा. तसेच पाहिजे तेव्हा रिक्रूटर्सना आपली माहिती काही क्षणांत मिळवता आली आणि तीही आपल्याच मुखातून तर...? दर वेळी प्रत्यक्ष भेट होईलच असे नाही. यासाठी आपला "व्हिडिओ रेझ्युमी' बनवून तो यू ट्यूबवर अपलोड करून ठेवा. सध्या "व्हिडिओ रेझ्युमी'चा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, अगदी फारच कमी लोकांचा स्वत:चा "व्हिडिओ रेझ्युमी' आहे. अनेकांच्यातून वेगळे असे काही आपले असलेले केव्हाही चांगलेच ना. एक चांगला "व्हिडिओ रेझ्युमी' हा छोटा, आपल्याबद्दल माहिती देणारा, आपण संस्थेस कसा फायदा पोचवून देऊ शकू हे सांगणारा असावा.



वरील सोशल मीडियासोबतच आपण गूगल ऍलर्टस्‌, फ्रीलान्सिंग, ट्‌विटर सर्च, स्वतःचा ब्लॉग इत्यादी वापरूनही जॉब शोधू शकता. हे सर्व पर्याय जर एकत्रितपणे व्यवस्थित नियोजन करून वापरले तर फक्त आपल्या नजीकच्याच नव्हे, तर संपूर्ण जगातील रोजगारसंधी आपणास उपलब्ध होतील; गरज आहे ती फक्त "सोशल' होण्याची.

वॅका, वॅका नव्हे, आता "यारो, इंडिया बुला लिया'

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीवरून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या गदारोळात सोमवारी एक उल्हसित करणारी बातमी समोर आली. या बातमीने सहाजिकच सर्वांच्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर उमटून गेली. ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या या खेळाच्या महामेळ्याचे गीत ऑस्करविजेते भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या संगीतातून गुंजणार असून, फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण झालेली "वॅका वॅका'ची "क्रेझ' या गीताने पुसली जाईल, असा विश्‍वास खुद्द संगीतकार रेहमान यांनी व्यक्त केला.




रेहमान यांच्याच हस्ते स्पर्धेच्या गीताचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी रेहमान म्हणाले, ""आता वॅका, वॅका नाही. आपल्याला त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन आकर्षक गीत सादर करायचे आहे. कसे, ते समजावून सांगण्यास कठीण आहे. पण जेव्हा ते तुम्ही ऐकाल तेव्हा हे गीत "वॅका, वॅका'पेक्षा वेगळे असल्याची तुमची खात्री पटेल.''



रेहमान यांनी या गाण्याविषयी काही माहिती दिली, पण गाणे कोणते असेल याबाबत त्यांनी गुप्तता बाळगली. केवळ गाण्याच्या सुरवातीचे शब्द त्यांनी ऐकविले. ते म्हणाले, ""भारतीय सांस्कृतिक वारसा आणि महात्मा गांधी यांना अभिवादन करणारा "ऑर्केस्ट्रा' करण्याचे नियोजन आहे. गाण्यासाठी भारतीय आणि परदेशी वाद्यांचे "फ्यूजन' उपयोगात करण्यात येईल. गाणे हिंदीतूनच असेल, पण यात दहा टक्के इंग्रजी शब्द असतील आणि गाणे असेल "यारो, इंडिया बुला लिया.'''



या गाण्याचे आज प्रकाशन करण्यात आले असले, तरी ते प्रदर्शित होण्यास अजून दहा दिवस तरी जाणार आहेत. रेहमान म्हणाले, ""गेले सहा महिने या गाण्यावर काम करत आहे. गाणे माझ्याच आवाजात असून, बरोबरीने कोरस असेल. माझी खात्री आहे की आम्ही केलेला प्रयोग यापूर्वी भारतात कधीच झाला नसेल. गाण्याच्या तयारीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम चालू असून, अजून दहा दिवसांत ते पूर्ण तयार होईल. उद्‌घाटन सोहळ्यात या गाण्याची निश्‍चित "धूम' असेल आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांना माझ्यासोबत मी गाण्याचे आवाहन करेन. खरेच हा अनुभव खूप जबरदस्त असेल.''



यालाही मंत्रिगटाचीच मान्यता

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे संयोजन समितीला निर्णय घेण्याचे कुठलेच अधिकार नाहीत. इथून पुढे मंत्रिगटाने "ग्रीन सिग्नल' दिल्यानंतरच त्यांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. स्पर्धा गीताच्या निमित्ताने मंत्रिगटाने पहिला निर्णय दिला. रेहमान म्हणाले, ""माझी सर्व कामे बाजूला ठेवून मी या गाण्यात झोकून दिले आहे. मंत्रिगटाला हे गीत आवडेल की नाही याबाबत मन साशंक होते. पण त्यांना गाणे आवडले आणि त्यांनी लगेच गाण्याला मान्यता दिली.'' त्यांच्या मान्यतेनंतरच रेहमान यांच्या उद्‌घाटन सोहळ्यातील कार्यक्रमास मंजुरी मिळाली.



एकूणच स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची झळ त्यांच्यापर्यंत येऊन पोचल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, ""प्रसारमाध्यमांनी आता नकारात्मक प्रसिद्धीपेक्षा सकारात्मक गोष्टी समोर आणण्यासाठी पुढे आले पाहिजे. लंडनमध्ये असतानाच मला नकारात्मक प्रसिद्धीची माहिती मिळाली होती. झाले गेले विसरून जा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चला आपण एकत्र काम करुयात.''

मारुतीच्या कार धावणार आता सीएनजीवर

मुंबई - मारुती सुझुकी कंपनीने आपली पाच मॉडेल्स नैसर्गिक वायू (सीएनजी) अंतर्गत रुपांतरित करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आता मारुतीच्या एसएक्‍स- फोर, इको, वॅगनआर, इस्टिलो आणि अल्टो आदी गाड्या सीएनजीवर धावतील. या पाच मॉडेल्सना अत्याधुनिक इंजिन जोडण्यात येणार असून इंटेलिजेंट गॅस पोर्ट इंजेक्‍शन अथवा आय-जीपीआय असे त्याचे नाव असेल. या इंजिनामुळे गाडीची क्षमता वाढून इंधन बचत होण्यासही मदत होईल.




मारुतीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीवरील कारमध्ये सर्वप्रकारची गुणवत्ता आढळून येईल. नेहमीच्या कारनिर्मितीप्रमाणेच याचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे.



त्याच्या किमती पुढीलप्रमाणे - अल्टो एलएक्‍सआय 2.78 लाख रुपये (पेट्रोल) आणि 3.23 लाख रुपये (सीएनजी), इस्टिलो 3.55 लाख रुपये (पेट्रोल) आणि 4.05 लाख रुपये (सीएनजी), वॅगनआर 3.61 (पेट्रोल) लाख रुपये आणि 4.11 लाख रुपये(सीएनजी), इको (एसी आणि पाच आसनी) 3.09 लाख रुपये (पेट्रोल) आणि 3. 64 लाख रुपये (सीएनजी), एपएक्‍स-फोर 6.92 लाख रुपये (पेट्रोल) आणि 7.47 लाख रुपये (सीएनजी).

बदल : काळाची गरज

बदल हा नेहमीच हळुवार होत असतो; परंतु त्याकडे डोळसपणे बघणे आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल करणे म्हणजे बदलत्या जगाशी जुळवून घेणे. बदलाचे प्रयत्न उत्साहाने राबवावेत, जोपर्यंत मूळ उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत प्रयत्न सातत्याने चालू ठेवावेत.




एकदा एक प्रयोग केला गेला. एका पाण्याने भरलेल्या भांड्यात एका बेडकाला सोडण्यात आले. ते भांडे मंद अशा विस्तवावर ठेवले. पाणी हळूहळू तापू लागले; परंतु तो बेडूक ते ऊबदार पाणी शेकत शांतपणे बसून राहिला.

बेडकाला हा उबदारपणा आवडला होता. त्यामुळे बेडूक अगदी खुशीत होता; परंतु जसजसे तापमान वाढू लागले, तसे बेडूक अस्वस्थ होऊ लागले; परंतु तरीही ते पाण्याबाहेर यायचा प्रयत्न करीत नव्हते. एका ठराविक तापमानावर पाणी गरम झाल्यावर बेडूक पाण्यातच राहिला व त्यातच मरण पावला.



बोध : बदल हा नेहमीच हळूवार होत असतो; परंतु त्याकडे डोळसपणे बघणे आणि त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल करणे म्हणजे बदलत्या जगाशी जुळवून घेणे.



बदल कसा स्वीकारावा?

'द आइसबर्ग इज मेल्टिंग' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक जॉन कोटर (जे "चेन मॅनेजमेंट' या संकल्पनेचे गुरू मानले जातात) यांनी बदल कसा घडवावा यासाठी आठ तत्त्वे सांगितली आहेत. ही तत्त्वे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एका सोसायटीत 50 बिऱ्हाडे आहेत व पाणीकपातीची चर्चा सुरू आहे.



महत्त्वाची आठ तत्त्वे

सोबतची आठ तत्त्वे आपण आपल्या दैनंदिन जीवनात, घरी, नोकरीच्या ठिकाणी वापरली असतीलच; पण याचा जाणीवपूर्वक उपयोग केला, तर बदल हा आनंददायी होऊ शकतो.

Ref :eSakal

मानवी व्यक्तिमत्त्वाचे व्यावहारिक पैलू

आपल्याला अनुकूल असणारा परिणाम साधण्यासाठी समोरच्या माणसाचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे गरजेचे असते. व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड पगडा माणसाच्या वागणुकीवर होतो. निरनिराळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या माणसांचा प्रभाव त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांवर, कळत-नकळत होत असतो. व्यक्तिमत्त्वावर भावनांचा विशिष्ट प्रभाव आढळून येतो. वस्तुतः व्यवहारामध्ये भावनांना किंमत नसते. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनांना बाजूला ठेवणेच इष्ट असते.




"व्यक्तिमत्त्व म्हणजे नक्की काय,' या प्रश्‍नाचे अचूक उत्तर देणे कदाचित अवघड वाटेल, कारण व्यक्तिमत्त्व साकारणारे अनेक गुणधर्म हे व्यक्तीगणिक बदलत जातात. अनेक तत्त्ववेत्त्यांनी "व्यक्तिमत्त्व' या शब्दाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. गॉर्डन ऑलपोर्ट यांनीच "व्यक्तिमत्त्व' या शब्दाच्या पन्नास व्याख्या केलेल्या आहेत. तथापि, या सर्व पुस्तकी व्याख्यांच्या अभ्यासातून फारसा व्यावहारिक अर्थबोध संभवत नाही.



व्यावहारिक पातळीवर "व्यक्तिमत्त्व' या शब्दाचे सोप्या भाषेत वर्णन करायचे झाले, तर ते खालीलप्रकारे करता येईल. "एखादा मनुष्य वरप्रकरणी जसा वाटतो, त्याला त्याचे व्यक्तिमत्त्व समजावे.' याचाच अर्थ एखादा मनुष्य वरकरणी जसा वाटतो, तसाच तो अंतरंगात असेलच असे नाही. बहुतांशी वेळा तो तसा नसतोच. परंतु, अशा बाह्यांगावर भाळणारे आणि विसंबून राहून निर्णय घेणारे बरेच लोक समाजात आढळून येतात.



वागणुकीवर परिणाम

व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड पगडा माणसाच्या वागणुकीवर होतो. निरनिराळ्या संस्थांमध्ये, औद्योगीक, सरकारी, निम-सरकारी, खासगी वगैरे. काम करणाऱ्या माणसांचा प्रभाव त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांवर, कळत-नकळत होत असतो. अशा ठिकाणी "चांगले व्यक्तिमत्त्व' किंवा "वाईट व्यक्तिमत्त्व' तसेच "अनुकूल व्यक्तिमत्त्व' किंवा "प्रतिकूल व्यक्तिमत्त्व' वर्गीकरण करणे, तितकेसे सयुक्तिक वाटत नाही.

काही व्यक्तींमुळे प्रशासनातील अवघड समस्या सहजपणे सोडवता येतात. तसेच काही व्यक्तींच्या अस्तित्वामुळे सर्व माणसांना अनावश्‍यक मानसिक त्रास होतो, काही व्यक्तींमुळे संस्थांमध्ये कलह होतात, असे अनेकदा ऐकण्यात येते. अशा सर्व समस्यांचे मूळ हे विशिष्ट व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वातच आढळून येते. समस्या निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व हे बऱ्याचदा अनाकलनीय किंवा गूढ असते. अशा व्यक्तिमत्त्वांच्या माणसांमुळे चांगले संबंध बिघडतात.



आपल्याला अनुकूल असणारा परिणाम साधण्यासाठी समोरच्या माणसाचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे गरजेचे असते. एखाद्या खटल्यामध्ये कशाप्रकारे बाजू मांडली असता, न्यायाधीश आपल्या बाजूने निकाल देतील, याचा अंदाज वकिलांना असणे गरजेचे असते. कुशल वकील ही बाब लक्षात घेऊन मुत्सद्दीगिरीने आणि धोरणाने वागून खटल्याचा निकाल स्वतःच्या बाजूने फिरवून घेऊ शकतो. या संबंधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलेला अनुभव विचारात घेणे, गरजेचे वाटते. एका खटल्याकडे अनेक कामगार युनियनचे तसेच उद्योजकांचे लक्ष्य होते. कारण, त्या खटल्यामध्ये कामगारांच्या प्रश्‍नांबाबत अनेक कामगारांचे भवितव्य ठरणार होते. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत खटल्याची सुनावणी तब्बल नऊ वेळा पुढे ढकलली.



प्रत्येक वेळी ते वेगळ्या पक्षाची बाजू घेत. त्यामुळे सर्व लोक संभ्रमित झाले होते. एखादेवेळी असे वाटायचे, की खटल्याचा निकाल कामगारांच्या बाजूने लागेल, तर दुसऱ्यावेळी असे वाटायचे की खटल्याचा निकाल उद्योजकांच्या बाजूने लागेल. शेवटी दहाव्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी निकाल हा कामगारांच्या बाजूने दिला.निकालानंतर न्यायाधीशांची व वकिलांची मुलाखत घेण्यात आली. न्यायाधीशांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला, "आपल्याला हा निकाल देण्यासाठी सुनावणी नऊ वेळा पुढे का ढकलावी लागली?,' न्यायाधीश उत्तरले, "वस्तुस्थिती काय आहे हे पहिल्याच सुनावणीमध्ये माझ्या लक्षात आले होते. मी फक्त सर्व बाजू चाचपून पाहात होतो.'

पत्रकारांनी वकिलांना प्रश्‍न विचारला, "न्यायाधीश ज्या वेळी सुनावणी पुढे ढकलत होते, तेव्हा आपल्या धोरणांमध्ये काही बदल करावा असे तुम्हाला वाटले का?' वकील उत्तरले, "मी न्यायाधीशांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे ओळखून आहे. मला माहीत होते की व्यक्तिमत्त्वाचा जो पैलू तो वरवर दाखवत होते, तो खरा नव्हता. त्यामुळे मी माझ्या धोरणावर व पवित्र्यावर ठाम राहिलो.'



संस्थांमध्ये काम करीत असताना सर्व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरेच पैलू समोर येतात, असे नाही. "माणसे जे बोलतात, त्याच्या बरोबर उलटे वागतात,' असे ऋषी प्रभाकर यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे कर्मचारी नक्की काय बोलतात यापेक्षा ते कोणती कृती करतात, हे महत्त्वाचे असते. अशा वागण्याला "संस्थांतर्गत राजकारण' असे म्हणतात.



(या ठिकाणी "राजकारण' या शब्दाचा अर्थ फक्त संस्थांमधील राजकारणांकरिता मर्यादित स्वरूपात वापरण्यात आला आहे.) अशा राजकारणी वर्तणुकीला किंवा राजकारणी डावपेचांना बळी न पडता योग्य ते निर्णय घेणे आणि सयुक्तिक वर्तणूक ठेवणे महत्त्वाचे असते.



निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वाची माणसे ताण-तणावाच्या प्रसंगांना सामोरे जाताना वेगवेगळ्या भावनांचे प्रदर्शन करताना दिसतात. उदा. कार्यालयामध्ये कामाचा कितीही ताण असला तरीही काही माणसे पूर्णतः तणावमुक्त असतात. तसेच, काही लोकांना कोणतेही काम तणाव निर्माण करणारे वाटते. याउलट काही माणसे केवळ तणावाखाली किंवा काही माणसे केवळ तणावविरहित वातावरणातच काम करू शकतात.



एका हॉस्पिटलमध्ये माझ्या पाहण्यात एक प्रसंग आला. एका वृद्ध गृहस्थांचे "ऑपरेशन' सुरू होते. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्यांचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांच्यामध्ये त्यांची दोन मुले होती.

दोनही मुले (एकाच परिस्थितीमध्ये) वेगवेगळ्या मनःस्थितीत वाटत होती. त्यांचा थोरला मुलगा अशांत आणि अस्वस्थ होता. त्याला वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटत होती. त्याच्या देहबोलीतून ते स्पष्ट दिसून येत होते. त्याच वेळी त्यांचा दुसरा मुलगा अत्यंत शांत व संयमी दिसत होता. इतर नातेवाइकांशी मृदू आवाजात संभाषण करीत होता. यामधील एक व्यक्तिमत्त्व "आदर्श', असे ठरविणे चुकीचे आहे. हा दोन व्यक्तिमत्त्वांमधील महत्त्वाचा फरक आहे.



व्यक्तिमत्त्व आणि बुद्‌ध्यांक यांचा संबंध असतोच असे नाही. एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले होते, की माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याएवढाच बुद्‌ध्यांक असणारी भारतामध्ये पाच हजार माणसे होती. परंतु, अशा पाच हजार माणसांपैकी केवळ एकच माणूस पंतप्रधान होऊ शकला. याचाच अर्थ, बुद्‌ध्यांक हा व्यक्तिमत्त्वाचा किंवा यशस्वी होण्यातील केवळ एक भाग आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये बुद्धिचातुर्याने व्यक्तिमत्त्वाला अनुकूल मुरड घालून यश मिळवणे आवश्‍यक असते.



भावनांचा प्रभाव

व्यक्तिमत्त्वावर भावनांचा विशिष्ट प्रभाव आढळून येतो. वस्तुतः व्यवहारामध्ये भावनांना किंमत नसते. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनांना बाजूला ठेवणेच इष्ट असते. "क्रिकेटची टीम निवडत असताना पाषाणहृदयी असावे आणि गुणवत्ता या एकाच निकषावर आधारित खेळाडूंची निवड करावी,' असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सुचवलेले आहे. तथापि, मानसिक भावनांचा अनादर करून किंवा त्यांना पूर्णपणे डावलून केवळ व्यावहारिक पातळीवर निर्णय घेणे कायम शक्‍य नसते किंवा बऱ्याचदा आवश्‍यक नसते. तारतम्याने विचार करून या बाबतीत निर्णय घेणे हितावह ठरते.



बुद्धी-मनाचा संबंध

मन आणि बुद्धी हे परस्परांबरोबर काम करत असतात. या दोघांच्या संवेदनांमध्ये जेव्हा भिन्नता येते किंवा खंड पडतो, तेव्हा माणसाला धक्का बसतो. उदा. रस्त्यावरून फिरत असताना अचानक मोठा आवाज होतो आणि एक अपघात होतो. कुतूहलापोटी गर्दीला मागे सारत आपण आवाजाच्या दिशेने जातो. जवळ पोचल्यावर असे दिसते, की आपण ज्या मित्राशी एका तासापूर्वी दूरध्वनीवर बोललो, तो अपघातात ठार झालेला आहे. अशा प्रसंगी बुद्धीला अपघातात आपला मित्र गेलेला आहे हे पटलेले असते, परंतु मन वस्तुस्थिती मान्य करायला तयार नसते.



व्यक्तिमत्त्व - जडणघडण हा संपूर्णतः वेगळा विषय आहे. व्यावहारिक पातळीवर विचार करता व्यक्तिमत्त्वाचे कोणते पैलू व्यावहारिक यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून विकसित करणे गरजेचे आहे, याचा सखोल विचार केल्यास अनेक समस्या सहजासहजी सुटू शकतात.

Ref : eSakal

Marathi Wallpapers

Get Free Mobile wallpapers On On http://www.myheartbuzz.com/

Wednesday, June 23, 2010

Get Free Wallpapers oF Marathi World मराठी वॉलपेपर्स,











Mi Marathi-मी मराठी-मराठी वॉलपेपर्स,मराठी शोध ,marathi wallpapers,Marathi Greetings,Marathi Images,Marathi Photos,Marathi Photos,Marathi Fotos,Marathi Scraps,Marathi Mobile wallpapers,Marathi Desktop wallpapers,Marathi BAckgrounds,Amhi MArathi Tradition,Just About Marathi World,



Wednesday, May 26, 2010

प्रेमाचे स्थान : हृदय

प्रेमाचे स्थान : हृदय
डॉ. श्री बालाजी तांबे

हृदय हे ओज, प्रेम व प्रेरणा यांचे मुख्य स्थान असते. मेंदू व मनाचा संबंध आहे असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात मनाचा व हृदयाचा संबंध असतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर परिणाम करतात. आपण हृदय विकसित केले तर जन्माचे कल्याण होते.




हृदय-फुफ्फुसे या जोडीतील फुफ्फुसे पुरुषासारखी व हृदय स्त्रीसारखे असते. हृदय तसेही मातृज असते. शरीरातून आलेले अशुद्ध रक्‍त फुफ्फुसांमध्ये येते व त्या ठिकाणी श्‍वासातून आलेला प्राणवायू व प्राण ही शक्‍ती मिळवून शुद्ध झालेले रक्‍त हृदयाकडे पाठवले जाते. पुरुष सर्व जगभर फिरून अनेक उद्योग करून चरितार्थासाठी लागणारी शक्‍ती मिळवितो, परंतु स्त्री शक्‍तीवर व अन्नावर संस्कार करून घरातील सर्व मंडळींना, पै-पाहुण्याला व येणाऱ्या-जाणाऱ्याला ताजेतवाने करून स्वतःच्या कार्यास प्रवृत्त करते. हृदय रक्‍ताचा स्वीकार करून पुन्हा ते सर्व शरीराला पोचविण्याचे काम करते आणि हृदय हे ओज, प्रेम व प्रेरणा यांचे मुख्य स्थान असते.



शरीररूपी गाडी चालायला आवश्‍यक असणारे पेट्रोल म्हणजे वीर्य. पेट्रोल गाडीच्या इंजिनात गेल्यावर तेथे हवेच्या विशिष्ट दाबाखाली येऊन ठिणगी पडली की ते भपकन पेटून शक्‍ती तयार होते. या तयार झालेल्या शक्‍तीने पिस्टन पुढे-मागे होतो व गाडी चालायला लागते. तसे हृदयातल्या कप्प्यात रक्‍त आल्यावर ठिणगी पडली की हृदयातून रक्‍त सर्व शरीराकडे पोचविण्याची क्रिया (डिलिव्हरी सिस्टीम) सुरू होते. हृदयाच्या ठिकाणी चेतना असते व हृदयाच्या ठिकाणी असलेले ओज वीर्यातून तयार झालेले असते. ओज हा एक स्वतंत्र विषय आहे. ओज हृदयात राहते, या कारणाने हृदयाला ओजाचे स्थान म्हटले जाते. पण मेंदूलाही ओजाची आवश्‍यकता असतेच. मेंदू, हृदय यांना ओजाची अधिक आवश्‍यकता असते. मेंदू व हृदयाने ओज घेतल्यावर उरलेल्या ओजाच्या द्वारा शरीर इतर कार्य करू शकते. अतिमैथुनात व्यस्त झालेल्या मंडळींच्या हृदयाला व मेंदूला ओजाची व वीर्याची पूर्ती नीट न झाल्याने ही मंडळी लवकर थकतात, ही माणसे निरुत्साही असू शकतात, त्यांच्यात जोश कमी असू शकतो.



शरीरात अभिसरण होणारे रक्‍त शरीराद्वारा वापरले गेले की अशुद्ध होते, त्यातील शक्‍ती निघून जाते. सर्व शरीरातील अशुद्ध रक्‍त हृदयाच्या एका कप्प्यात येते. हृदयाचे आकुंचन झाले की हे अशुद्ध रक्‍त फुफ्फुसात येते. फुफ्फुसात आलेले अशुद्ध रक्‍त प्राणवायूच्या संपर्कात येते व शुद्ध होते. हे शुद्ध आलेले रक्‍त पुन्हा हृदयाच्या एका कप्प्यात येते व हृदयाच्या आकुंचनामुळे ते सर्व शरीरभर पोचवले जाते. अशा तऱ्हेने हृदय पंपासारखे काम करत असते.



हृदय हे प्रेमाचे व मनाचे स्थान आहे, हे ज्या भारतीयांनी शोधले त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे. हृदयात प्रेमाचे स्थान असते. मनुष्यमात्राला काही अडचण आहे का, त्यांना आपण काही देऊ शकतो का, वगैरे भावना हृदयात निर्माण होते. प्रेमाचे प्रतीक दाखवायचे असेल तर आपण हृदयाचे चित्र काढत राहतो. हृदयातच प्रेमाचा वास असतो. हृदयातच भक्‍तीचा वास असतो. हृदयातच एखाद्या मनुष्यासाठी असलेले समर्पण असते.



याच संदर्भात रामायणात एक कथा आहे. हनुमान म्हणाले, ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट मला नको. स्वतःच्या छातीत राम आहे हे दाखविण्यासाठी हनुमंतांनी स्वतःची छाती फाडून दाखविली. असे जर आपण हृदय विकसित केले तर जन्माचे कल्याण होते, अन्यथा जन्माला आला व मरून गेला, एवढेच घडते. रक्‍ताचे शुद्धीकरण होत राहते, शरीर रक्‍त वापरत राहते. या कार्यात महिनोन्‌ महिनेच काय, वर्षानुवर्षे काहीही फरक पडत नाही.

आपल्या शरीरात जेवढी म्हणून शक्‍तीची केंद्रे आहेत, त्यांना कमळाची उपमा दिलेली आहे. हृत्पद्म, सहस्रदलपद्म वगैरे.



हृदय हे उलट्या ठेवलेल्या कमळासारखे असते व ते छातीच्या मध्यभागी असून, एका बाजूला किंचित कललेले असते. हृदयरूपी कमळातून निघालेल्या दांड्या वरच्या बाजूने निघालेल्या असतात. दांड्या वर असल्याने उलट्या ठेवलेल्या कमळाची उपमा दिलेली आहे. कमळ जसे उमलते व बंद होते तसे हृदयही उघडते व बंद होते, म्हणजे त्याचे आकुंचन व प्रसरण होत असते. निसर्गातील कमळाच्या फुलाबद्दल एक आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कमळाच्या फुलावर प्रकाश पडेपर्यंत ते उघडे राहते, प्रकाश पडायचा बंद झाला की ते बंद होते. म्हणून कमळ सकाळी उमलते व सूर्यास्ताच्या सुमाराला बंद होते. शिवाय कमळाच्या पाकळ्या उघड-बंद होताना त्यांची रचना बिघडलेली दिसत नाही.



आपल्या हृदयाला सांभाळणे आपले काम आहे. ते सहसा तक्रार करत नाही हे लक्षात ठेवून त्याची काळजी लक्षपूर्वक घेणे आवश्‍यक असते.

हदयाची उघडझाप अविरतपणे चालू असते, पण त्यात अडथळा का निर्माण होतो, हे पाहणे आवश्‍यक आहे. हृदयाचा हृत्कमल असा उल्लेख सर्व भारतीय वाङ्‌मयात, आयुर्वेदात, योगशास्त्रात सापडतो. आपले हृदय सतत कार्यरत असते. हृदय हेच मनाचे व प्रेमाचे स्थान आहे. मेंदू व मनाचा संबंध आहे असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात मनाचा व हृदयाचा संबंध असतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर परिणाम करतात. रात्रंदिवस कार्यरत असलेल्या हृदयाला अचानक असे काय होते, की ज्यामुळे आपले जीवन संपुष्टात येऊ शकते. सहसा हृदय तक्रार करत नाही, त्याने तक्रार केली तरी आपण तिकडे लक्ष देत नाही, त्यामुळे हृदयाचे दुखणे विकोपाला जाते, आपल्याला त्रास होतो व आपण जागे होतो.



आपल्या शरीरातील इतर चक्रांनाही कमळाचीच उपमा दिलेली असते. मणिपूर चक्राच्या ठिकाणचे सूर्यकमळ, ब्रह्मरंध्राच्‌?ा ठिकाणचे सहस्रदलपद्म वगैरे. सहस्रदलपद्म वर उमलणारे आहे व त्याची व्याप्ती सर्व शरीरभर असते. याला हजार पाकळ्या आहेत असे म्हणत असताना खरोखरच आपल्या मेंदूत हजारो नाड्या कार्यरत असतात, असे आढळते.



हृदयात रक्‍त आत येणे, हृदयाच्या आकुंचनाबरोबर सर्व रक्‍त शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसांकडे पोचविणे, फुफ्फुसांकडून आलेले शुद्ध रक्‍त हृदयाच्या आकुंचनाबरोबर सर्व शरीरभर पोचविणे, हे काम अविरतपणे होत असते. यात अडथळा का येतो, हेही समजून घेण्यासारखे आहे.



- डॉ. श्री बालाजी तांबे

Ref _eSakal

श्रेयकारी बुद्धी

श्रेयकारी बुद्धी


बुद्धी व मनाच्या शुद्धीसाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या नित्य अभ्यासाने मनाची शक्‍ती वाढते. मन स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले, तर त्यामुळे बुद्धीसुद्धा आपले काम व्यवस्थित करू लागते आणि मग अर्थातच शरीर-मनाची सर्व कार्ये व्यवस्थित होऊ लागतात. प्राणायामापेक्षाही अधिक प्रभावी उपचार म्हणजे ॐकार गुंजन. यामुळे प्राणायामाचे फायदे मिळतातच; पण मन व बुद्धी अधिक चांगल्या प्रकारे शुद्ध होऊ शकतात.




सामान्यतः बुद्धी शब्दाचा अर्थ हुशारी असा केला जातो. सांगितलेले चटकन समजणे, ते लक्षात राहणे आणि योग्य वेळी आठवणे हे ज्याला सहज जमते, तो हुशार व बुद्धिमान, असा समज झालेला दिसतो; पण बुद्धीची व्याप्ती याहून खूप मोठी आहे. बुद्धीवर जबाबदारीही याहून जास्ती आहे.

अंतःकरणातील एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे बुद्धी. करण म्हणजे साधन. साधन कशाचे, तर ज्ञान करून घेण्याचे. या ज्ञानाच्या साधनांचे दोन गट पाडलेले आहेत...



1. अंतःकरण : यात मन, बुद्धी व अहंकार या तिघांचा समावेश होतो.

2. बाह्यकरण : यात पाच ज्ञानेंद्रियांचा समावेश होतो.



ज्ञानेंद्रियांचा आपापल्या विषयांशी संयोग होतो, पण त्याचे ज्ञान आत होण्यासाठी अंतःकरणाची आवश्‍यकता असते. उदा.- कानांनी ऐकले असे आपण समजत असलो, तरी कानाच्या ठिकाणी राहणाऱ्या श्रोत्रेंद्रियांचा बाहेरच्या बाजूला गाण्याशी संयोग होतो. मनाबरोबर बुद्धी व अहंकार आपला कौल देतात आणि मग आत्मा त्या गाण्याचा अनुभव घेतो. म्हणूनच मन थाऱ्यावर नसले किंवा इतर कोणत्या तरी विषयात गुंतले असले, तर कानावर पडलेला शब्द आतपर्यंत पोचू शकत नाही किंवा बुद्धी आणि अहंकाराने अगोदरपासून अमुक गोष्ट ठरवली असली, तरी शब्दाचा सरळ अर्थ आतपर्यंत पोचत नाही, पूर्वग्रहानुसार अर्थ काढला जातो. व्यवहारात ही गोष्ट अनेकदा अनुभवता येते; पण असे होऊ नये. जे जसे आहे तसेच आतपर्यंत पोचविण्याचे काम बुद्धीचे असते.

समं बुद्धिर्हि पश्‍यति, उचिता बुद्धिः समं यथाभूतं पश्‍यति ।

...चरक शारीरस्थान



बुद्धी सम म्हणजे जे जसे आहे तसे पाहते. बुद्धी उचित असली, शुद्ध असली तरच हे शक्‍य असते.

निश्‍चयात्मिका बुद्धिः ः निश्‍चयाप्रती पोचविणारी ती निश्‍चयात्मिका बुद्धी असेही म्हटले जाते. हे करू का ते करू, हे चांगले का ते चांगले, अशी मनाची दोलायमानता संपुष्टात आणून एका निर्णयाप्रत पोचविण्याचे काम फक्‍त बुद्धी करू शकते. बुद्धी जेवढी शुद्ध असेल तेवढे ती स्वतःचे काम व्यवस्थित करू शकते; पण बुद्धी भ्रष्ट झाली तर त्यामुळे अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात आणि शेवटी मनुष्याचा नाश होतो.



म्हणूनच बुद्धी फक्‍त हुशारीपुरती मर्यादित नसते, तर जीवन संपन्न करायचे असेल, खऱ्या अर्थाने जगायचे असेल आणि स्वतःचा उत्कर्ष साधायचा असेल, तर बुद्धी चांगली असायला हवी, शुद्ध असायला हवी.

बुद्धीची व्याप्ती इतकी मोठी आहे, की बुद्धीलाच काही ठिकाणी प्रज्ञा असे संबोधलेले आहे. चरकसंहितेत पहिल्या अध्यायात रोगाचे मुख्य कारण काय आहे, हे समजावताना म्हटले आहे -



कालबुद्धीन्द्रियार्थानां योगो मिथ्या न चाति च।

द्वयाश्रयाणां व्याधीनां त्रिविधो हेतुसंग्रहः।।



काळ, बुद्धी व इंद्रिय यांचा अयोग, मिथ्यायोग व अतियोग हे सर्व रोगांचे कारण असतात. या ठिकाणी बुद्धी हा शब्द "प्रज्ञा' या अर्थाने वापरलेला आहे.

म्हणजेच बुद्धी, धृती व स्मृती हे तीन प्रज्ञाभेद असले तरी त्यात बुद्धी हीच सर्वश्रेष्ठ असते. बुद्धी बिघडली आणि प्रज्ञापराध घडला तर त्यातून अनेक शारीरिक, मानसिक विकार होऊ शकतात.

शुद्ध बुद्धीची व्याख्या अशी केलेली आहे-

बुद्धेः निश्‍चयात्मकज्ञानकरत्वे पाटवम्‌ ।...चरक सूत्रस्थान



निश्‍चित व योग्य ज्ञान करण्याचे कौशल्य म्हणजे बुद्धीची शुद्धता. याउलट बुद्धी भ्रष्ट झाली की काय हितकर आहे, काय अहितकर आहे, काय क्षणभंगुर आहे, काय चिरंतन आहे, हे समजू शकत नाही. उलट विषमज्ञान होते, म्हणजे जे हितकर आहे ते अहितकर वाटते; जे चिरंतन आहे त्याकडे लक्ष न देता क्षणभंगुराची ओढ लागते. चांगले काय, वाईट काय हे कळेनासे होते. करायला पाहिजे त्या गोष्टी होत नाहीत, जे करायला नको ते करावेसे वाटते. मुख्य निर्णय देणारी बुद्धीच चुका करायला लागली, की नंतर सगळेच शारीरिक, मानसिक व्यवहार चुकीचे होत जातात.



शुद्धौ बुद्धिप्रसादः।...सुश्रुत चिकित्सास्थान

म्हणजे मन शुद्ध असले, तरच बुद्धी प्रसन्न राहू शकते आणि मनाच्या शुद्धीसाठी आयुर्वेदात सत्त्वावजय म्हणून उपचार सांगितला आहे. मन शुद्ध ठेवण्यासाठी, "सत्त्वावजय' होण्यासाठी चरकसंहितेत खालील उपाय सुचविले आहेत-



ज्ञानविज्ञानधैर्यस्मृतिसमाधिभिः ।...चरक सूत्रस्थान

ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती व समाधी यांच्यायोगे मनावर नियंत्रण ठेवता येते.



ज्ञानम्‌ अध्यात्मज्ञानम्‌ ।

ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान असे टीकाकार सांगतात. अध्यात्म हा शब्द या ठिकाणी आत्मा, निर्वाण संबंधातले अध्यात्मशास्त्र या अर्थाने वापरलेला नाही, तर "स्व-शरीर' या अर्थाने वापरलेला आहे.



आत्मशब्दो।त्र स्वशरीरवचनः ।

येथे "आत्म' हा शब्द शरीरवाचक आहे. म्हणजेच मनावर काम करण्यासाठी अगोदर स्वतःचे शरीर, स्वतःची प्रकृती माहिती हवी. आहार काय असावा, आचरण कसे असावे, कामधंद्याचे स्वरूप कसे असावे, या सर्व गोष्टींबद्दल यथार्थ ज्ञान असायला हवे. उदा.- एखाद्याची प्रकृती नाजूक व संवेदनशील असली आणि त्याला नोकरीधंद्याच्या ठिकाणी अतिरिक्‍त मानसिक ताण येत असला, तर हळूहळू मानसिक अनारोग्याची सुरवात होऊ शकेल.



विज्ञानम्‌ शास्त्रज्ञानम्‌ ।

अर्थात निरोगी मनासाठी शास्त्राची योग्य माहिती असायला हवी. यात आरोग्यशास्त्र, तसेच इतर जीवन संपन्न करण्यास मदत करणाऱ्या शास्त्रांचा अंतर्भाव होतो. यामुळे मनावर चांगले संस्कार होऊ शकतात आणि बुद्धीने, प्रज्ञेने दिलेल्या निर्णयानुसार हे संस्कारसंपन्न मन योग्य गोष्टी करण्यास प्रयुक्‍त होते. शास्त्रांची, खऱ्या ज्ञानाची माहितीच नसेल, तर बुद्धीही चुकीचा निर्णय देते. मनही संस्कारशून्य असल्याने चुकीच्या गोष्टींकडे धाव घेते.

धैर्यमविषादेन परीक्षेत्‌ ।...चरक विमानस्थान



धैर्य म्हणजे धीर. मनाने धीर सोडता कामा नये. धीर सुटला, मन खचले तर मनावर नियंत्रण ठेवणे आणखीनच कठीण होते. धीर कायम ठेवण्यासाठी मन विषण्ण होऊ न देणे गरजेचे असते. त्यामुळे किमान छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनाचा त्रागा न करणे, चुकीच्या किंवा अवाजवी अपेक्षा न ठेवणे, चांगल्या गोष्टी ऐकण्या-वाचण्याने, मन शांत करणारे संगीत ऐकण्याने, कुठल्यातरी चांगल्या गोष्टीत रमवून मन प्रसन्न व शांत ठेवले तर मनाची "धैर्यता' टिकवता येऊ शकते.



स्मृति - अनुभूतार्थस्मरणम्‌ ।

अनुभवातून शहाणपण येते असे म्हटले जाते ते खरेच आहे. चांगल्या वागण्याचे झालेले चांगले फायदे व चुकीच्या वागण्याने झालेले नुकसान स्मृतीत ठेवले, बरा-वाईट अनुभव गाठीशी ठेवला तर मनाला योग्य व चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करता येते.

समाधी-विषयेभ्यो निवर्त्य आत्मनि मनसो नियमनम्‌ ।

विषयांपासून निवृत्त होऊन मन आत्म्याच्या ठिकाणी केंद्रित होणे म्हणजे "समाधी'. ही अवस्था साध्य होणे अवघड असले, तरी त्या दृष्टीने होता येईल तेवढे प्रयत्न निश्‍चितपणे करता येतात. विषयप्राप्तीसाठी शरीरास पळविणारे मन आवरून व नियमित करून, त्याला शरीरात म्हणजे पर्यायाने आत्मरूपात समाविष्ट करणे ही समाधी. अशा प्रकारे सात्त्विकतेची परमावस्था म्हणजे समाधी.



बुद्धिन्द्रियमनः शुद्धिमारुतस्यानुलोमता।

सम्यक्‌ विरिक्‍तलिंगानि कायाग्नेश्‍चानुवर्तनम्‌ ।।



बुद्धी, इंद्रिये आणि मन यांची शुद्धी, वाताचे अनुलोमन आणि अग्नी समस्थितीत राहणे हे सर्व शास्त्रोक्‍त पद्धतीने केलेल्या योग्य विरेचनाने शक्‍य होते.

बुद्धी व मनाच्या शुद्धीसाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या नित्य अभ्यासाने मनाची शक्‍ती वाढते. मन स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले, तर त्यामुळे बुद्धीसुद्धा आपले काम व्यवस्थित करू लागते आणि मग अर्थातच शरीर-मनाची सर्व कार्ये व्यवस्थित होऊ लागतात. प्राणायामापेक्षाही अधिक प्रभावी उपचार म्हणजे ॐकार गुंजन (सोम ध्यानपद्धत). यामुळे प्राणायामाचे फायदे मिळतातच; पण मन व बुद्धी अधिक चांगल्या प्रकारे शुद्ध होऊ शकतात.



बुद्धी व मेधा संपन्न असाव्यात असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. बुद्धी प्रगल्भ करता येते, संस्कारांच्या माध्यमातून बुद्धी तल्लख करता येते, बुद्धीला चालना देता येते. हे काम गर्भावस्थेमध्ये गर्भसंस्कारांच्या माध्यमातून करता येते. विशेषतः गर्भसंस्कार संगीतातील मंत्र, स्तोत्र, विशेष वाद्यांचे वादन यांच्या साह्याने करता येते आणि जन्मानंतर बुद्धी व मेधाकर गणाच्या साह्याने साध्य करता येते.



सतताध्ययनं वादः परतन्त्रावलोकनम्‌ तद्विद्याचार्य सेवा च इति बुद्धिमेधाकरो गणः ।...सुश्रुत चिकित्सास्थान

सतत अध्ययन-अध्ययन करणे म्हणजे नुसते पाठांतर करून चालत नाही, तर विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक असते. विषय समजणे म्हणजे नुसता शब्दांचा अर्थ लक्षात ठेवणे नाही, तर आतले ज्ञान ण्याचा प्रयत्न करणे.



वाद ः वाद म्हणजे चर्चा. ज्या शास्त्राचा अभ्यास करतो आहोत त्या शास्त्रासंबंधी इतरांशी चर्चा करणे, आपले शास्त्रसंमत मत मांडणे.



परतंत्रावलोकन ः इतर शास्त्रांकडे लक्ष ठेवणे, पण तरीही स्वतःच्या शास्त्राशी ठाम राहणे.



तद्विद्याचार्यसेवा ः शास्त्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत, निपुण आहेत, त्यांची सेवा करणे, त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे.



थोडक्‍यात काय, तर शरीर व मनाचे संपूर्ण आरोग्य राखायचे असेल, संपन्न जीवन जगायचे असेल, तर त्यासाठी शुद्ध, संपन्न बुद्धी आवश्‍यक आहे आणि हे करणे आपल्याच हातात आहे.



- डॉ. श्री बालाजी तांबे

शोएबची बंदी रद्द करण्यासाठी दबाव

इस्लामाबाद - बंदी आणि दंडाच्या शिक्षेतून शोएब मलिकची सुटका करण्यासाठी करण्यात येणारा डाव मी सफल होऊ दिला नाही, आणि तसे झाले असते तर शिक्षा झालेल्या इतर खेळाडूंवर अन्याय झाला असता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी मंगळवारी केला.




शोएब मलिकची "सुटका' करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर दबाव टाकला जात आहे, अशी सनसनाटी माहिती एजाझ बट्ट यांनी उघड केल्यामुळे पाकिस्तान राष्ट्रीय असेम्बली समितीही (क्रीडा) आश्‍चर्यचकित झाली आहे. ऑस्ट्रेलिया वादग्रस्त दौऱ्यानंतर इतर खेळाडूंसह शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या शोएब मलिकवर एका वर्षाची बंदी आणि दंड करण्यात आलेला आहे.



"माझ्यासाठी सर्व खेळाडू समान आहेत. मी कोणालाही झुकते माप देऊ शकत नाही आणि कोणावर अन्यायही करू शकत नाही,'' असे सांगून बट्ट म्हणाले, ""खेळाडूंवरील बंदी आणि शिक्षेसंदर्भातले प्रकरण लवादाकडे असून, त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल.''



एजाझ बट्ट यांच्यावर कोणी दबाव आणला याची माहिती उघड करण्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नकार दिला, परंतु शोएबच्या लग्नासाठी उपस्थित राहिलेल्या सियालकोटच्या खासदारांचे हे "प्रयत्न' असल्याचे समजते.



राष्ट्रीय असेंम्बली समितीचे नवे अध्यक्ष इक्‍बाल महम्मद खान यांना पाकिस्तान क्रिकेटच्या भल्यासाठी खेळाडूंना करण्यात आलेल्या दंड आणि बंदीच्या शिक्षेचा फेरविचार करण्याची सूचना केली आहे. माजी कर्णधार युनूस खानला करण्यात आलेली आजीवन बंदी उठविण्यासाठी ही समिती आग्रही असल्याचे बोलले जात आहे.



वासीम बारी अध्यक्ष असलेल्या चौकशी समितीसमोर झालेल्या चौकशीचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण काढून टाकण्याचीही मागणी राष्ट्रीय असेम्बली समितीने केली आहे.



पाक मंडळ फेरविचार करणार

दरम्यान, सात खेळाडूंवर करण्यात आलेल्या दंड आणि बंदीच्या शिक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट मंडळाने घेतला आहे. पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खेळाडूंच्या मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वर्तणूक आणि घडामोडींची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनंतर पाक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दारुण पराभव स्वीकारल्यानंतर पाक मंडळाने सात खेळाडूंवर कडक कारवाई केली होती. त्यानुसार युनूस खान आणि मोहम्मद युसूफ यांच्यावर आजीवन बंदी घातली होती. शोएब मलिक व राणा नावेद यांच्यावर एका वर्षाची बंदी आणि 20 लाखांचा दंड करण्यात आला होता. शाहीद आफ्रिदी आणि कामरान अकमल यांना अनुक्रमे 30 लाखांचा दंड आणि पुढील सहा महिन्यांपर्यंत वर्तन सुधारण्याचा इशारा देण्यात आला होता, तर उमर अकमलला 20 लाखांचा दंड करण्यात आला होता
 
Ref - eSakal

रोहिणी नक्षत्राच्या प्रारंभीच शेतकऱ्यांनी सुरू पेरणी

देवरूख - गेले चार दिवस आकाशात काळे ढग जमा होत असतानाच आणि गेले दोन दिवस पावसाच्या हलक्‍या सरींनी प्रारंभ केला असतानाच कोकणातील शेतकऱ्यांनी कालपासून रोहिणी नक्षत्राच्या प्रारंभीच पेरणी सुरू करून आपल्या वार्षिक कालचक्राला प्रारंभ केला आहे.




कोकणात दरवर्षी न चुकता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणींना प्रारंभ केला जातो. रोहिणी नक्षत्राच्या सुरवातीलाच आणि मृग नक्षत्र लागण्याआधीच पेरणी करण्याची पध्दत पुर्वापार सुरू आहे. यावर्षीचे रोहिणी नक्षत्र काल मंगळवारपासून सुरू झाले. त्याआधीच शेतकऱ्यांनी बि बियाणे खरेदी, खतांची बेगमी करून नांगर आणि बैलजोडीची तयारी करून ठेवली होती. यावर्षी पाऊस वेळेवर येणार असल्याने शेतकऱ्यांनीही पेरणी वेळेवर व्हावी यासाठी जय्यत तयारी केली आहे. रासायनिक खतांचे दर गेल्यावर्षी पेक्षा 25 ते 40 रुपयांनी वाढल्याने आणि रासायनिक खतांचा पुरवठाही सुरळीत नसल्याने असंख्य शेतकऱ्यांनी मिळेल तेवढे रासायनिक खत आणि सेंद्रीय खताचा वापर करण्याची तयारी केली आहे.



गेले चार दिवस आकाश भरून येत असल्याने आणि त्यातच गेले दोन दिवस संपूर्ण कोकणातील बहुतांश परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. भल्या पहाटे गेले दोन दिवस शेतकरी आपल्या कुटुंबासह बैलजोडी आणि नांगर घेऊन शेतात राबताना दिसत असून दोन महिन्यापूर्वी भाजावळी गेलेल्या मळ्यांमध्ये उखळ करून भातपेरणी सुरू करण्यात आली आहे. पेरणीच्या कामाला सुरवात झाल्याने शेतकरी आता आपल्या शेतीच्या वार्षिक कालचक्रात अडकला आहे. पेरणीनंतर संपुर्ण शेतात उखळ, बेर, साफसफाई नंतर चांगला पाऊस होऊन रोप तयार झाल्यावर लावणी अशा कामांमध्ये शेतकरी गुंतून पडणार आहे. गणपतीच्या सणापर्यंत ही लगबग सुरूच राहणार आहे.

Tuesday, May 25, 2010

भुईकोट किल्ल्यात खापरी नळाचे अवशेष

नगर - नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदकाची साफसफाई वेगात सुरू असून, येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुन्या काळातील खापरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी यंत्रणा खंदकात आढळली असून, या खापरी नळाचे सापडलेले अवशेष जतन करण्यात येणार आहेत.




सुमारे सव्वादोन किलोमीटर लांबीच्या या खंदकातील सुमारे एक किलोमीटर अंतरातील झाडेझुडुपे काढण्यात आली असून, आता आतील माती उचलून बाहेर नेण्याचे काम दोन जेसीबी यंत्रांद्वारे सुरू आहे. त्यामुळे आता हा परिसर विस्तीर्ण दिसू लागला आहे. साफसफाईदरम्यान खंदकात खापरी नळाचे अवशेष तसेच जुन्या काळातील एक विहीरही आढळली. पाचशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी झाली तेव्हा किल्ल्यातील रहिवाशांसाठी कापूरवाडी व शहापूरमधून खापरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. या नळ योजनेचे अवशेष सापडले आहेत.



पहिल्या टप्प्यात खंदकाच्या साफसफाईनंतर वरच्या बाजूला खंदक ते रस्तादरम्यानच्या किल्ल्याभोवतीच्या परिसराची साफसफाई करण्यात येणार आहे. या परिसरात बगीचा विकसित करण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी खंदकाभोवती कुंपण उभारण्यात येणार आहे. खंदकाच्या काही भागात नौकानयन प्रस्तावित असून, तो भाग अधिक खोल खणला जाणार आहे. अन्य भागात बगीचा व अन्य उपक्रम करण्यात येणार आहेत.



सुमारे सहा कोटी रुपये खर्चून किल्ल्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासाचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील सुशोभिकरणाची कामे सुरू झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.



पावसाच्या पाण्याचा वापर

खंदकाच्या काही भागात नौकानयन प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी पावसाचे पाणी साठवून व शुद्धीकरण प्रक्रिया करून वापरले जाणार आहे. यादृष्टीने पावसाचे पाणी साठण्यासाठी नौकानयन प्रकल्पाचा भाग खोल करून तेथे खंदकातील अन्य भागांतील पावसाचे पाणी येण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.

Monday, May 24, 2010

जाती आधारित जनगणनेचा विषय मंत्रीगटाकडे

नवी दिल्ली - जातीवर आधारित जनगणनेचा विषय मंत्रीगटाकडे सोपविण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक येथे झाली. त्यामध्ये जातीवर आधारित जनगणनेचा विषय चर्चेला आला. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.




जातीवर आधारित जनगणनेच्या विषयावरून सध्या देशात राजकीय क्षेत्रात वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी जातीवर आधारित जनगणनेचा विषय संसदेत लावून धरला होता. भारतीय जनता पक्षानेही जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीवर आधारित जनगणनेस विरोध दर्शविला. या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी भाजपने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ याबाबत काय निर्णय घेते, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.
 
Ref : eSakal

Wednesday, May 12, 2010

Sai Baba of Shirdi,साईबाबा हे शिर्डीचे

साईबाबा शिर्डीचे


साईबाबा हे शिर्डीचे साईबाबा म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्त्व्यामूळे आधुनिक तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले आहे. बाबांचा आशिर्वाद घेण्या साठी देश विदेशातील लोक येथे येतात अलैकीक शक्ति प्राप्त असलेले श्री साबाबा शिर्डीत प्रगटले आणि जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील अवतारकार्य पूर्ण केले व तेथेच समाधिस्त झाले. साईबाबांनी आपल्या अवतार कार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिले होते की, देहत्यागा नंतर माझी हाडे समाधितून बोलतील व या ठिकाणी माणसांची रिघ लागेल. याचा प्रत्यय आजही येतो आहे. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. १५ आक्टोबर १९१८ साली दसय्राच्या दिवशी श्री साईबाबांचे महानिर्वाण झाले.

साईबाबा शिर्डीत आल्यानंतर आपली जात कधीही कुणाला सांगितली नाही. साईबाबा पुढे सर्व् लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षपणाची शिकवन दिली.

Shanta Shelke





Shanta Janardan Shelke



Background


Shanta Shelke was born in Indapur, Pune. She was educated in Pune's Sir Parshurambhau College (S. P. College). She completed her M.A. in Marathi and Sanskrit and stood first in Bombay University. During this time she also won the Na. Chi. Kelkar and Chiplunkar awards.


She spent 5 years working as assistant editor of the weekly Navyug run by Acharya Atre. She then moved to Nagpur to work as a professor of Marathi in Hislop College, Nagpur. She retired after a long service from Dayanand College, Mumbai and settled in Pune.


During her working career in Mumbai, she also served in

The Film Censor board
The Theatre examination board
The Govt. book award


Lalit Literature:


She also produced lalit literature like


Anandache Jhad (आनंदाचे झाड)

Translation: The tree of happiness

Pavsaadhicha Paus (पावसाआधीचा पाउस)

Translation:The rain before the rains

Sansmarane (संस्मरणे)

Translation:Memories

DhoolPati (धूळपाटी) - an introspective autobiography.

Avad Nivad (आवड निवड)

Translation: Like dislikes

Vadildhari Manase (वडीलधारी माणसे) - a collection of character sketches.

Translation: Father figures



Collection of stories


She produced story collections like:


Anubandh (अनुबंध)

Kachkamal (काचकमळ)

Kaveri (कावेरी)

Jahaj (जहाज)

Gulmohar (गुलमोहर)

Premika (प्रेमिका)*Mukta (मुक्ता)

Savashna (सवाष्ण)


Novels
She penned novels like:

Odh (ओढ)

Dharma (धर्म)

Punarjanma (पुनर्जन्म)

Chikkhaldrayancha Mantrik (चिखलदर्यांचा मांत्रिक)

Nararakshas (नरराक्शस)

Bhishanchaya (भीषण छाया)

Majha Khel Mandu De (माझा खेळ मांडू दे)

Vijhti Jyot (विझती ज्योत)

 
Awards and recognitions :


Soor Singaar award for her song Mage ubha mangesh (मागे उभा मंगेश, पुढ़े उभा मंगेश)

Govt. of India award of excellent for song-writing for her cinema Bhujang (भुजंग)

Ga Di Madgulkar award in 1996.

Yashvantrao Chawan Pratishan Award in 2001, for her contribution to Marathi literature.



 Death


Shanta Shelke died of cancer, on June 6, 2002.




Tuesday, May 11, 2010

तेलगळतीमुळे ऑलिव्ह रिडलीची हजारो अंडी नष्ट


तेलगळतीमुळे ऑलिव्ह रिडलीची हजारो अंडी नष्ट

ऋषिकुल्य रूकरी (ओरिसा) - गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्य नदीच्या मुखावरील पुळणीवर, नामशेष होण्याचा धोका असलेल्या ऑलिव्ह रिडली कासवांची हजारो अंडी फलित होऊ शकली नाहीत. जवळच्या गोपाळपूर बंदरात झालेल्या तेलगळतीचा परिणाम असल्याचा पर्यावरणवादी संघटनांनी दावा केला आहे.




अंडी फलित होण्याचा काळ गेल्या आठवड्यातच संपला. मात्र ४० ते ५० टक्के अंडी फलित होऊ शकलेली नाहीत. ही संख्या काही हजार इतकी आहे. जवळच्या बंदरातील तेलगळतीमुळे, कासवांच्या घरट्यांपर्यंत तेलतवंग पोचले होते. त्यामुळेच ही अंडी फलित होऊ शकली नाहीत, असे ऋषिकुल्य सागरी कासवे संरक्षण समितीचे सचिव रवींद्रनाथ साहू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



ऋषिकुल्य किना-यावरील कासवांच्या घरट्यांच्या क्षेत्रातील सात किलोमीटरपर्यंत तेलतवंग पसरलेला आहे. गेल्या १२ एप्रिल रोजी जवळच्या गोपाळपूर बंदरात एस्सारच्या मालकीच्या तेलाच्या टँकरमधून आठ टन फर्नेस ऑईलची गळती झाली आहे. भरतीच्या लाटांमुळे ते तेल किना-यावर पसरले.



साहू म्हणाले, की ऋषिकुल्य गावातील अनेक ग्रामस्थांनी तेलाने लडबडलेली मोठी कासवे प्रत्यक्ष पाहिली आहेत. यंदा ओरिसातील या किना-यावर १,५५,००० दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांनी मार्चमध्ये घरटी केली होती. गेल्या तीन आठवड्यांपासून ही अंडी फलित होऊ लागली आणि गेल्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली.

ओरिसात व्याघ्रगणनेस वनाधिका-यांचा नकार

ओरिसात व्याघ्रगणनेस वनाधिका-यांचा नकार

भुवनेश्वर - ओरिसातील नौपाडा जिल्ह्यातील सुनाबेडा अभयारण्यात व्याघ्रगणनेस, वन खात्याच्या अधिका-यांनी नकार दिला आहे. या जंगलात माओवाद्यांचा वावर असल्याची भीती त्यांना भेडसावत असल्याने, ही मोजणी आपल्या जिवावर बेतू शकते, असे त्यांना वाटते.




या जंगलात माओवादी मुक्तपणे फिरत आहेत, अशी तक्रार वनाधिका-यांनी केली आहे. गेल्या ८ मे पासून या जंगलात वाघांची शिरगणती सुरू झाली आहे. या संदर्भात राज्य सरकारला कळविण्यात आले आहे, असे ओरिसाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. एन. पाधी यांनी सांगितले.



छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे गेल्या २९ एप्रिलला माओवाद्यांनी बीएसएफच्या पथकावर केलेल्या हल्ल्यानंतर, अनेक माओवादी ओरिसात शिरले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संगराम स्वेन या वन कामगाराने त्यांना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा पाधी यांनी केला आहे.



या अभयारण्यात माओवादी असल्यास त्याची गृह खात्याला माहिती असावी, असे वन खात्याचे सचिव यू. एन. बेहेरा यांनी सांगितले. सुनाबेडा अभयारण्यात १५ गावे असून चाकुईता, पहारिया आणि भुंजिया या जमातींचे सुमारे १५ हजार आदिवासी राहतात. या आदिवासींनी यापूर्वीही माओवाद्यांशी संघर्ष केला आहे. या अभयारण्याने ६०० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले असून, त्याची सीमा छत्तीसगड राज्याला भिडली आहे.

Ref : Eskal

कागदी पिशव्यांच्या वापरासाठी रोटरी क्‍लबतर्फे जनजागृती

कागदी पिशव्यांच्या वापरासाठी रोटरी क्‍लबतर्फे जनजागृती

पुणे - निसर्गाचे व पर्यावरणाचे संतुलन सांभाळणाऱ्या, जैविक विघटनास सुकर असणाऱ्या प्लॅस्टिकऐवजी रद्दी वर्तमानपत्रांपासून बनविलेल्या कागदी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन रोटरी क्‍लब ऑफ पुणे सेंट्रलचे सुरेंद्र श्रॉफ यांनी केले आहे. त्यासाठी प्रचाराची मोहीमही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.




वर्तमानपत्रापासून या पिशव्या कशा तयार कराव्यात, यासाठी क्‍लबतर्फे देशभरात आतापर्यंत चारशे ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास चार हजार नागरिकांनी प्रशिक्षण घेतले आहे, तर चाळीस गटांनी हे उपजीविकेचे साधन बनविले आहे. या गटांनी आतापर्यंत एक कोटी पिशव्यांची निर्मिती करून विक्री केली आहे. त्यासाठी क्‍लबतर्फे आर्थिक मदतही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



या पिशव्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन राहत असून मलनिस्सारणाचे पाइप तुंबणे, जनावरांना त्रास होणे आदी सर्वच गोष्टींना आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच पन्नास पैशांपासून ते पाच रुपयांपर्यंत या पिशव्या उपलब्ध होऊ शकतात. एक किलोपासून 15 किलोपर्यंतचे वजन त्या पिशव्या पेलू शकतात. त्यामुळे ज्यांना या पिशव्या हव्या असतील अथवा तयार करण्याचे प्रशिक्षण हवे असेल, त्यांना क्‍लबतर्फे निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी इच्छुकांनी 9850561557 अथवा 25677498 येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रॉफ यांनी केले आहे.

Monday, May 10, 2010

तंत्रज्ञानामुळे बसतोय घातक वायूंना आळा

तंत्रज्ञानामुळे बसतोय घातक वायूंना आळा

पुणे - "नवनवीन तंत्रज्ञानामुळे घातक वायूंना आळा बसण्यास मदत होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच देश कमी-अधिक प्रमाणात या दिशेने प्रयत्न करीत आहेत. ओझोन थराला हानी पोचविणाऱ्या "क्‍लोरोफ्लुरो कार्बन' वायूची निर्मिती सर्वच देशांनी नवीन तंत्रज्ञान वापरून एक जानेवारी 2010 पासून थांबविली आहे. आता वातानुकूलित यंत्रांमधून निर्माण होणाऱ्या "हायड्रोफ्लुरो कार्बन'ला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातील ओझोन कृती गटाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. या विशेष मुलाखतीत पर्यावरण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल श्री. शेंडे यांनी भाष्य केले.




पृथ्वीपासून 15 ते 40 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या "ओझोन' थराला हानी पोचविणारे एकूण 97 वायू आणि रसायने आहेत. त्यात "क्‍लोरोफ्लुरो कार्बन' हा रेफ्रिजरेटरमध्ये वापरण्यात येणारा प्रमुख घटक आहे. क्‍लोरोफ्लुरो कार्बनचा वापर रेफ्रिजिरेटरमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असे. त्या संदर्भात श्री. शेंडे म्हणाले, "क्‍लोरोफ्लुरो कार्बनमुळे ओझोनला धोका असल्याचे 1975 मध्ये पुढे आले. विकसित देशांनी या संशोधनाला विरोध केला. मात्र, 1985 मध्ये "नासा' आणि "युरोपियन स्पेस एजन्सी'च्या शास्त्रज्ञांनी धोक्‍याचा नव्याने इशारा दिल्यानंतर त्यांना जाग आली. 1987 मध्ये 24 देशांनी एकत्र येत "मॉंट्रियल करार' केला. इतर देशांनाही त्याचे महत्त्व पटले. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेले सर्व देश त्यात सहभागी झाले. करारातील उल्लेखानुसार पर्यायी वायूंवर संशोधन सुरू झाले. विकसित राष्ट्रांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे घातक वायूंची निर्मिती पूर्णपणे थांबविण्यात यश आले. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाला अपायकारक वायूंचेच उत्पादन बंद करण्यात असे यश मिळते आहे.''



संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांनिमित्त श्री. शेंडे भारत दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, "पर्यावरण वाचविण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांनी "मॉंट्रियल करार' केला आहे. रेफ्रिजिरेटर आणि एअर कंडिशनरमध्ये तयार होणारे अनुक्रमे क्‍लोरोफ्लुरो आणि हायड्रो क्‍लोरोफ्लुरो हे वायू "ओझोन' थराला हानी पोचवितात. तापमानवाढीस क्‍लोरोफ्लुरो कार्बन वायू जास्त हानिकारक असतो. करारानुसार सर्व देश या वायूला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विकसित देशांकडून विकसनशील देशांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2030 पर्यंत "एसीएफसी' पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2007 मध्ये या देशांनी एकत्र येऊन पर्यायी वायू वापरण्याचा निर्णय घेतला आहे. "एसीएफसी' वायू तापमानवाढीस किती घातक आहे, हे विकसित देशांना पटवून देण्यास बराच काळ लागला. पर्यावरणाच्या रक्षणासाठी "एसीएफसी'चे उत्पादन बंद करण्यात यश आले, तसेच आता "हायड्रो क्‍लोरोफ्लुरो कार्बन' या वायूचे उत्पादन बंद करण्यात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.''



ओझोन गटाचा उद्देश

- जागतिक तापमानवाढ रोखणे

- ओझोनच्या थराचा होत असलेला ऱ्हास थांबविणे

- कार्याची व्याप्ती संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असेलेल्या जगभरातील 195 देशांमध्ये
 
 Ref : Esakal

मराठी भाषा

मराठी भाषा

मराठी भारत के महाराष्ट्र प्रांत में बोली जानेवाली सबसे मुख्य भाषा है। भाषाई परिवार के स्तर पर यह एक आर्य भाषा है जिसका विकास संस्कृत से अपभ्रंश तक का सफर पूरा होने के बाद आरंभ हुआ। मराठी भारत की प्रमुख भाषओं में से एक है। यह महाराष्ट्र और गोआ में राजभाषा है। मातृभाषियों कि संख्या के आधार पर मराठी विश्व में पंद्रहवें और भारत में चौथे स्थान पर है। इसे बोलने वालों की कुल संख्या लगभग ९ करोड़ है। यह भाषा १३०० वर्षों से प्रचलन में है, और यह भी हिन्दी के समान संस्कृत आधारित भाषा है।

भाषाई क्षेत्र

मराठी भाषा भारत के अतिरिक्त मॉरिशस और इस्राइल में भी मराठी मूल के लोगों द्वारा बोली जाती है। इनके अतिरिक्त अन्य देश भी हैं जहाँ मराठी मूल के लोग निवास करते है और वे इस भाषा का उपयोग करते है जिनमें प्रमुख हैं - अमेरिका, संयुक्त अरब अमीरात, दक्षिण अफ़्रीका, पाकिस्तान, सिंगापुर, जर्मनी, संयुक्त राजशाही (ब्रिटेन), ऑस्ट्रेलिया, और न्यूज़ीलैंड।


भारत मे मराठी मुख्यतः महारष्ट्र में बोली जाती है। इसके अतिरिक्त यह गोआ, कर्णाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिल नाडु, और छत्तीसगढ़ में बोली जाती है। केन्द्र शासित प्रदेशों में यह दमन और दीव, और दादर और नागर हवेली में बोली जाती है।

आधिकारिक स्थिति :

मराठी, भारतीय राज्य महाराष्ट्र की आधिकारिक भाषा है, और गोआ, केन्द्र शासित प्रदेशों दमन और दीव, और दादर और नागर हवेली में सह-आधिकारिक भाषा है या आधिकारिक कार्यो में उपयोग में लाई जाती है। भारत का संविधान मराठी को भारत की २२ आधिकारिक भाषाओं में से एक के रूप में स्वीकार करता है।




महाराष्ट्र के सभी विश्वविद्यालयों के अतिरिक्त, बड़ोदा (गुजरात) का महाराजा सयाजीराओ विश्वविद्यालय, ओस्मानिया विश्वविद्यालय (आंध्र प्रदेश), गुलबर्ग विश्वविद्यालय (कर्णाटक), इंदौर का देवी अहिल्या विश्वविद्यालय, और गोआ विश्वविद्यालय (पणजी) में मराठी में उच्च शिक्षा के लिए विशेष विभाग हैं। जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नई दिल्ली ने भी मराठी के लिए एक विशेष विभाग बनाने की परियोजना की घोषणा की है।

सुविचार

-पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.


- श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते. (गौतम बुध्द)

- विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल. (विनोबा भावे)

- प्रसंगावधान महत्त्वाचे.

- जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.

- कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते. (महात्मा गांधी)

- जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही. (इमर्सन)

- सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते. (लेडी मॉटेज)

- समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.

- पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.

- यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.

- हि-याहूनही 'ज्ञान' अधिक मौल्यवान आहे.

- आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा!

- मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.

- दुस-यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.

- मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळत नाही.

- मन अतिशय सुंदर आहे (असते) त्याला प्रसन्न ठेवयाशिवाय आपल्याला चालना येत नाही.

- कष्टाने पैसा मिळवावा.

- सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेच जीभ.

- स्वत:साठी जे करू ते स्वत:बरोबरच संपते.

- शस्त्र हे धारण करणा-यालाही घातकच असते.

- देण्याची पात्रता जो कमावतो त्यालाच घेण्याचा अधिकार असतो.

- नव्या बादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊ नये.

- स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील तर झोपून राहू नका.

- जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.

- ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही भिकारडाच राहतो.

- कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य.

- काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.

- अयोग्य माणसा बरोबर आनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दु:खात राहणे बेहत्तर.

- झोप आली असतांना जो झोपी जात नाही आणि झोप येत असतांना जो जागा राहतो असा मनुष्य, हा भूतलावर एक मात्र प्राणी आहे.



- जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे.

- शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाहीत (महात्मा गांधी)

- समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.

- शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असावी.

- अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.

- राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.

- आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपच प्रेम मिळते.

- मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय.

- व्यक्तिच्या मनात वसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.

- सर्वकाही आनंदीवृत्तीने केल्यास करायला कठीण असे कोणतेच काम असणार नाही.

- चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.

- कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.

- गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तम ध्येय ठेवावे.

- प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.

सुविचार



-पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)


- दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.

- त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)

- युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.

- जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!

- जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.

- लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.

- आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.

- सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.

- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.

- दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.

- आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.

- सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !

- उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.

- जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.

- संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.

- ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.

- शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.

- कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!

- मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.

- अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.

- चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.

- काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.

- कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.

- उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.

- कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.

- पवित्र असावे पण पतित होऊ नये.

- त्याग करावा पण ताठा नसावा.

- स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.

- आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.

- स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.

- घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

- माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.

- सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर...परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!

- मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.

- श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.

- ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.

Saturday, May 8, 2010

कापूस उत्पादकांसाठी नव्या खताचे वरदान


कापूस उत्पादकांसाठी नव्या खताचे वरदान

हिस्सार - कापूस उत्पादक शेतक-यांना आता मे आणि जूनमधील भाजून काढणा-या उन्हातही आपल्या पिकांचे रक्षण करता येणार आहे. येथील शास्त्रज्ञांनी अथक संशोधन करून, नवीन प्रकारच्या व्हर्मी कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. या खताच्या वापरामुळे कापसाचे ४५ ते ४८ अंश सेल्सिअस उष्णतेमध्येही योग्य संरक्षण होते, असा दावा करण्यात आला आहे.



या नव्या व्हर्मी कंपोस्ट खताला 'एझोटिका एचटी-५४' असे नाव देण्यात आले आहे. येथील चौधरी चरणसिंह कृषी विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विभागातील शास्त्रज्ञांनी त्याचे तंत्र शोधून काढले आहे. मे आणि जून महिन्यांतील उन्हामुळे कापसाचे पीक कोमेजते आणि त्याच्या वाढीवर परिणाम होतो. ४५ ते ४८ अंश सेल्सिअस उष्णतेमध्ये हे पीक करपून जात असल्याचा अनुभव आहे. मात्र अशा उन्हातही ते टिकून राहावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून संशोधन चालू होते.


कडक उन्हामुळे अॅझोटोबॅक्टर, रिझोबियम, अॅजोस्पिरिलम, ग्लुकॉन ही वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सूक्ष्मद्रव्ये नष्ट होतात. मात्र 'एझोटिका एचटी-५४'मुळे ४८ अंशापर्यंतच्या उन्हातही या द्रव्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचत नाही, असे दिसून आले. हे खत विविध प्रकारांनी वापरता येऊ शकते. परंतु, बियाणांवर त्याची प्रक्रिया केल्यास, त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो, असे येथील शास्त्रज्ञांनी सांगितले.

REF.- Esakal




Tuesday, May 4, 2010

मराठी उखाने

मराठी उखाने

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...


लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...!


अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश


सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!




***रावांची थोरवी मी सांगत नाही


कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!




इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव


**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!



सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून


***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून!!



पावाबरोबर खाल्ले अमूल बटर...

***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर



एक होती चिऊ एक होती काऊ...

***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ...



कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ...

अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस

*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस



कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र

***** नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र



ईवले ईवले ह्रीण, त्याचे ईवले ईवले पाय,

****** राव आले नाहीत अजुन,

पिउन पडले की काय....... !!



चांदीच्या ताटात ठेवले होते गहू

लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ



एक होती चिऊ एक होती काऊ

गणपत रावांच नाव घेते , डोक नका खाऊ



अंगणात पेरले पोतेभर गहू

लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ



चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे

घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे



बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या


गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या



लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास

अन गणपतरावांच्या घशात अडकला घास



आजघर माजघर माजघराला नाही दार

गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार



कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला

........शी लग्न करून ......जन्माचा धुपला



कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क

हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क



रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल

गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल



समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू

गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू



लाडाने जवळ गेले, केली जरा घसट

गणपतराव एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट !



बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.

*****राव बिड्या पितात संडासात बसून



आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..

आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..!!




















ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे

ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे

मुंबई - मराठी मालिका अन्‌ चित्रपटांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. मराठीतील प्रतिभावंत कलावंतांची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही मराठी कलाकारांनी आपला झेंडा रोवला आहे. आता त्यापाठोपाठ ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे पडले आहे. "फ्रेमफ्लिक्‍स ऍनिमेशन अवॉर्ड'च्या पहिल्या दहा नामांकनामध्ये मराठी तरुणांच्या तब्बल चार ते पाच "ऍनिमेशन शॉर्टफिल्म' दाखल झाल्या आहेत. त्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात येतील. अंतिम सोहळा 16 मे रोजी गोवा येथे पार पडणार आहे.




"ऍनिमेशन' तसेच "व्हिज्युअल्स इफेक्‍ट'मध्ये आवड असणाऱ्या तरुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी "फ्रेमबॉक्‍स' या आघाडीच्या ऍनिमेशन आणि "व्हिज्युअल्स इफेक्‍ट स्टुडिओ'ने "फ्रेमफ्लिक्‍स ऍनिमेशन अवॉर्ड'ची घोषणा केली. या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. केवळ भारतातूनच नाही तर भारताबाहेरीलही काही तरुणांनी आपापल्या "शॉर्ट फिल्म' पाठविल्या होत्या. त्यापैकी केवळ दहा "ऍनिमेशन शॉर्टफिल्म'ची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये चार मराठी तरुणांच्या "शॉर्टफिल्म' आहेत. त्यामध्ये पुणे येथील दोन आणि वाशी (नवी मुंबई) व अंधेरी (मुंबई) येथील एकेक "शॉर्टफिल्म' निवडण्यात आली आहे. त्यांची नावे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. याबाबत "फ्रेमबॉक्‍स'चे सीईओ नवीन गुप्ता म्हणाले, ""आम्ही "ऍनिमेशन'मध्ये "करिअर' करणाऱ्या नवनवीन गुणवान कलाकारांना नेहमीच संधी देत आलो आहोत. महाराष्ट्रातील तरुणांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभला. "धूम' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी, एएए डिजिटल इमॅजिनचे अरविंद कुमार, प्राणा स्टुडिओजचे नीलेश सरदेसाई अशा एकूण अठरा जणांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.''

Saturday, May 1, 2010

'बिझनेस

व्यवसायाच्या यशात व्यवस्थापनाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे व्यवस्थापकीय अधिका-यांची जबाबदारी सगळ्यात मोठी.


व्यवस्थापकीय क्षेत्रातील गुरू मानले जाणा-या लोकांना धोरण, निर्णय याबद्दल बोलायला आवडतं हे खरं परंतु बरेचवेळा व्यवस्थापनाचे निर्णय हे प्रत्यक्षात अधिका-यांच्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारलेले असतात. असे वेगळे उदाहरण म्हणून महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून राहणारे व्यवस्थापन गुरू जयशंकर ह्यांचे नाव घ्यावे लागेल. जय म्हणून ओळखले जाणारे जयशंकर बहूराष्ट्रीय कंपन्यांसाठी 'बिझनेस महाराजा' म्हणूनही ओळखले जातात. अवघ्या ४१व्या वर्षी 'पर्किन एल्मर' या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षपदाची जय यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. अब्जावधी रूपयांचं उत्पन्न असलेली पर्किन एल्मर १२५ देशांमध्ये कार्यरत आहे.



जयशंकर यांनी ''बिट्स पिलानी'' मधून अभियंतेची पदवी मिळवून कोलकत्ता आयआयएम येथून एमबीएची व्यवस्थापकीय पदवी घेतली आहे. त्यांनी 'हिंदूस्थान लिव्हर'मधून आपल्या करिअरचा प्रवास सुरू केला. लिव्हरमधील अन्न-तंत्रज्ञान विभागात १३ वर्षांच्या अनुभवानंतर 'ग्लॅक्सो' कंपनीच्या माध्यमातून औषधी कंपन्यांच्या जगामध्ये प्रवेश केला. जय 'नोवार्टिस' या कंपनीमध्ये जागतिक कार्यवाही विभागाचे अध्यक्षही होते. सेल्स, मार्केटींग, संशोधन विभाग, सप्लायचेन अशा विविध विभागांमध्ये काम करून जय यांचे अनुभव विश्व अधिक समृध्द झाले. प्रचंड ऊर्जा, दूरदृष्टी असलेला सृजनशील नेता मिळाल्यामुळे पर्किन एल्मरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ठरवलेल्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्याचाच जय यांचा खाक्या असतो. आज ते त्यांच्या कंपनीला भारतातील 'आरोग्य विज्ञान' क्षेत्रात प्राथमिक स्थान मिळवून देण्यासाठी फक्त नेतृत्व करत नाहीत तर भारतातील तमाम जनतेची आरोग्यशैली उत्तम होण्यासाठी सुध्दा प्रयत्नशील आहेत.



जय यांच्या दूरदृष्टीने प्रत्येक दिवस नवीन संधीची दालनं उघडून देणारा आणि आव्हानपूर्ण असतो. 'बिझनेसच्या प्रत्येक पैलूमध्ये सृजनशीलता आणि नवीन कल्पनांचं स्वागत करणं' हेच जय यांच बिझनेस तत्वज्ञान आहे. त्यांच्यामते कोणत्याही कठीण आव्हानावर कठोरपणे वस्तूनिष्ठ पध्दतीने चिकित्सा करुन तसेच सकारात्मक दृष्टीकोनातून मात करता येते. कंपनीमधील कर्मचारी ही त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी ताकद आहे. जय म्हणतात, ''कर्मचा-यांना तुम्ही सशक्त दृष्टीकोन असलेल्या, उत्तम ब्राण्ड आणि उच्च मूल्य जपणा-या कंपनीमध्ये काम करत आहात याची जाणिव करून देणं गरजेचं असतं आणि आम्ही ती करून देतो." जर ते या गोष्टींना बांधील राहिले, तर कामाला पोषक असं उत्साही वातावरण निर्माण होऊन कंपनीची उत्पादन क्षमता वाढते.



तुम्ही तुमच्या सहका-यांना प्रेरणा कशी देता असा प्रश्न विचारला असताना जयशंकर म्हणतात, ''जर तुम्ही नम्र असलात तर कोणालाही तुमच्याकडे यायला दडपण वाटणार नाही. अध्यक्षाच्या खूर्चीमध्ये न बसता ऑफिसमधील सहका-यांच्या बरोबरीने त्यांच्याकृतीमध्ये सामील होणं अतिशय महत्वाचं आहे. स्वप्न बघणं, त्यासाठी स्वत:ला सारखं प्रेरणा देणं महत्त्वाचं आहे. कंपनी प्रमुखाने स्वत:साठी आणि कंपनीसाठी पात्रतेची पातळी ठरवणं गरजेचं आहे. ती स्पष्ट असली की योग्य दिशा मिळते. सरते शेवटी आदर मागून मिळत नाही तर कमवावा लागतो."



जयशंकर हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, गुजराथी, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, या भाषा अस्खलित बोलतात. मराठी वाचता येतं पण शुध्द आणि अस्खलित बोलता येत नाही, बोललेलं समजतं! त्यामुळे सहका-यांशी संवाद साधणं शक्य होतं. जय हे उत्तम खेळाडूसुध्दा आहेत. शाळा-कॉलेजमध्ये असतांना टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट खेळलेले आहेत. फुटबॉल अजूनही खेळतात. मुंबईच्या पीडीपी मैदानावर त्यांनी 'सॉकर-क्लब' स्थापन केला आहे. १९९८ साली रगबी खेळतांना डाव्या पायाच्या हाडाजवळचा भाग तुटला होता. डॉ. श्रीनिवास यांनी त्यांना चालता येणं शक्य नसल्याचं सांगितलं. भौत्तिकोपचार तज्ज्ञाकडून सहा महिने त्यांनी व्यायाम करवून घेतला. त्यावेळी त्यांना उचलून गाडीमध्ये ठेवून ऑफिसला न्यावं लागतं होतं. मुंबई मॅरेथॉनला धावण्याच्या महत्त्वकांक्षेपायी त्यांनी चालायला आणि नंतर धावायला सुरुवात केली.

गेली चार वर्ष जयशंकर मुंबई मॅरेथॉन धावत आहेत. त्यांच्यामते मॅरेथॉन धावतांना आपल्याला ऑलिम्पिक धावपटू बरोबर स्पर्धा करायची नसून ती स्पर्धा स्वतःशीच असते. त्यासाठी नियोजन करणं आणि नियोजन कार्यवाहीत आणणं ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो.



जयशंकर यांना मदर तेरेसा प्रेरणादायी वाटतात. गरजूंना मदत करणे आणि लोकांशी संवाद साधून अनुभव आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यातून जय समाजाशी बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न करतात. जय यांची पत्नी अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यांना सहा आणि अकरा वर्षाचे दोन मुलगे आहेत. कुटूंबापासून प्रचंड आनंद आणि उर्जा मिळते असं जय अगदी आवर्जून सांगतात.



नवीन तंत्रज्ञानाची जाण, खिलाडूवृत्ती, कुटूंब आणि ऑफिसमधील कर्मचा-यांशी मुक्तपणे संवाद साधणारे जयशंकर एका यशस्वी व्यवस्थापकाशिवाय अत्यंत उमदा माणूस म्हणून ओळखले जातात ह्यात नवल ते काय.

Thursday, March 11, 2010

आता ना राहिली... -मराठी कविता


आता ना राहिली...

 आता ना राहिली

स्वप्नांची जाग

जिद्दीची आग अन

अन्यायाचा राग

आता फक्त राहिले

सैतानी दाग

अश्रूंची साथ अन

कुंकवाची राख



आता ना राहिली

मायेची फुंकर

प्रेमाची झालर अन

गोजिरी पाखर

आता फक्त राहिले

छिन्नविछिन्न मुडदे

मासांचे उकिरडे अन

प्रेतांचे तुकडे



आता नाही दिसत

शांतीदूताचा संदेश

स्वच्छ सुंदर देश अन

माणुसकीचा लवलेश

आता फक्त दिसते

अंगाची चाळण

दहशतीचे वण अन

लाचार जन



आता ना राहीला

पूर्वीचा थाट

हिरवीगार वाट अन

नात्याची गाठ

आता फक्त राहीला

मृत्युचा गाडा

रक्ताचा सडा अन

झपाटलेला वाडा



आता नाही होत

मदतीचे हात

पाठीवर थाप अन

सुखाची झाप

आता फक्त होते

नेत्याची बडबड

छातीची धडधड अन

आशेची पडझड



आता ना राहिली

जगण्याची आस

प्रेमाची कास अन

सुखाचे तास

आता फक्त राहिला

असुराचा वास

भीतीचा भास अन

रावणाच्या घरी

रामच दास !




Tuesday, March 2, 2010

चार पेग घेता घेता... - मराठी कविता


चार पेग घेता घेता...



चार पेग घेता घेता काल रात्र झाली !

घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली ! ॥धृ॥

आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?

जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?

कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली ! ॥१॥



रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;

रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !

आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥



अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठी

ओसरीवरी ती धाडे निजावयासाठी !

आम्ही ते पती की ज्यांना बायको न वाली ! ॥३॥



उठा-बशा काढत काढत संपल्या उमेदी !

असा कसा झालो माझ्या घरी मीच कैदी ?

मी अपार दु:खी, माझी चालली हमाली ! ॥४॥



उभा फ्लॅट झाला आता एक बंदिशाला

जिथे सिंह ताटाखालिल मनी-माऊ झाला !

कसे पुरुष दुर्दैवी अन्‌ स्त्रिया भाग्यशाली ! ॥५॥



धुमसतात अजुनी उदरी भुकेचे निखारे !

अजुन अन्न मागत उठती रिक्त पोट सारे !

दूषणेच पत्नीची ती आम्हाला मिळाली ! ॥६॥



बरसतात ’खोड्या’वरती जिभेचे निखारे !

अजुन रक्त काढत बसती शब्द बोचणारे !

आम्ही महिषरूपी राक्षस; भासते ती काली ! ॥७॥



[उषःकाल होता होता ह्यावरून घेतलेली कविता]

मुन्ना बागुल

Friday, February 26, 2010

पाक क्रिकेट प्रशिक्षकपद चॅपेल यांनी नाकारले

नवी दिल्ली - इंतिखाब आलम यांच्याऐवजी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅपेल यांना करारबद्ध करण्याचे ठरविले आहे. चॅपेल गुरुजींनी मात्र त्यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कधीही प्रशिक्षण देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले, की पाक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम बारी यांनी मला दूरध्वनी केला. त्यांनी प्रस्ताव ठेवल्यामुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटले; पण मी तो नाकारला. यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून सक्रिय होण्याची महत्त्वाकांक्षा मी ठेवलेली नाही.

Tuesday, February 23, 2010

तुकाराम तथा रामदास

तुकाराम तथा रामदास

17वीं शती में तुकाराम तथा रामदास ने एक ही समय धर्मजागृति का व्यापक कार्य किया। ज्ञानदेवादि वारकरी संप्रदाय के अधिकारियों द्वारा निर्मित धर्ममंदिर पर तुकाराम के कार्य ने मानों कलश बैठाया। पोथी पंडितों के अनुभवशून्य वक्तव्यों तथा कर्मकांड के नाम पर दिखलाए जानेवाले ढोंग का भंडाफोड़ करने में तुकाराम की वाणी को अद्भूत ओज प्राप्त हुआ। फिर भी जिस साधक अवस्था से उन्हें जाना पड़ा उसका उनके द्वारा किया हुआ वर्णन काव्य का उत्कृष्ट नमूना है।




रामदास का साहित्य परमार्थ के साथ साथ प्रापंचिक सावधानता का तथा समाजसंघटन का उपांग है। छत्रपति शिवाजी महाराज के गुरु होने के कारण उनके चरित्र की उज्वलता बढ़ गई। फिर भी उनके द्वारा प्रयत्नवाद, लोकसंग्रह, दुष्टों के दलन इत्यादि के संबंध में दिए गए बोध के कारण उन्हें स्वयं ही वैशिष्ट्य प्राप्त हुआ है। दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक आदि उनके ग्रंथ परमार्थ के विचार से परिपूर्ण हैं। उनके कतिपय अध्यायों के विषय राजनीतिक विचारों से प्रभावित हैं।



तुकाराम रामदास के कालखंड में वामन पंडित, रघुनाथ पंडित, सामराज, नागेश, तथा विट्ठल आदि शिवकालीन आख्यानकर्ता कवियों की एक लंबी पंरपरा हो गई। शब्दचमत्कार, अर्थचमत्कार, नाद माधुर्य, और वृत्तवैचिय इत्यादि इन आख्यानों की विशेषताएँ हैं। वामन नामक पंडित की यथार्थदीपिका गीताटीका उनकी विद्वत्ता के कारण अर्थगंभीर व तत्त्वांगप्रचुर हो गई है। स्वप्न में तुकाराम का उपदेश प्राप्त कर लेनेवाले महीपति प्राचीन मराठी के विख्यात संत चरित्रकार हो गए हैं। कृष्णदयार्णव का "हरिवरदां" तथा श्रीधर कवि के हरिविजय, रामविजय, आदि ग्रंथ सुबोध व रसपूर्ण होने के कारण आबाल वृद्धों को बहुत पंसद आए। इन परमार्थप्रवृत्त पंडितों की परंपरा में मोरोपंत का विशिष्ट स्थान है। इनके रचित आर्या भारत, 108 रामायण तथा सैकड़ों फुटकर काव्यरचनाएँ भाषाप्रभुत्व एवं सुरस वर्णनशैली के कारण विद्वन्मान्य हुई हैं।



पेशवाओं के समय में "शाहिरी" (राजाश्रित) कवियों ने मराठी काव्य की अलग ही रूप रंग प्रदान किया। रामजोशी, प्रभाकर होनाजी बाला इत्यादि कवियों ने संत कवियों के अनुसार परमार्थ पर काव्यरचना न करते हुए समकालीन इतिहास सामग्री ग्रहण कर वीरसपूर्ण काव्य का निर्माण किया। इन कवियों द्वारा रचित "पोवाडा" (पँवाडा, कीर्तिकाव्य) साहित्य महाराष्ट्र के इतिहास का ओजस्वी अंग है। इन्हीं राजकवियों के लावणी साहित्य में स्त्रीपुरुषों के श्रृंगार का भव्य वर्णन है। यद्यपि इनमें से कितनों ने ही वैराग्य पर भी "लावणी" साहित्य का निर्माण किया है, फिर भी इनका वैशिष्ट्य पोवाड़े तथा श्रृंगारिक लावणियों में ही व्यक्त हुआ है।